महानगरपालिका
Trending

आनंदी शनिवार साजरा करण्यासाठी आजपासून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योगाचे धडे !

मनपा  शिक्षकांना योग प्रशिक्षण

संभाजीनगर लाईव्ह, दि १० डिसेंबर –  महानगरपालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण देण्याकरिता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शिक्षण विभाग व असू दे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन व निपुण भारत अभियान अंतर्गत दर आठवड्याला शनिवारी वाचन दिन साजरा केला जातो.

याबरोबरच कला क्रीडा व कार्यानुभव तसेच योगा कवायत इत्यादी विषयाचेही कौशल्य प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शनिवार आनंदी शनिवार साजरा करण्यासाठी आजपासून शाळांमध्ये योगाचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या जीवनात  योगाचे किती महत्त्व आहे त्याबाबत जागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या ७० शाळेमधून प्रत्येकी एका शिक्षकाचे योग प्रशिक्षण देण्यात येत आहे.

त्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण ४० शिक्षकांचे प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथील ध्यानधारणा सभागृहात देण्यात आले.

दादोजी कोंडदेव हायस्कूल शाळेचे शिक्षक सचिन धोत्रे यांनी सर्व शिक्षकांना योगाचे महत्त्व तसेच याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व शिक्षकाकडून करून घेतले या प्रशिक्षणाला उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड  आणि शिक्षणाधिकारी  संजीव सोनार  यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षणाचे नियोजन ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी , असू दे फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच गौतम मोकळे विशेष शिक्षक  व इस्तियाक यांनी मेहनत घेतली. तसेच प्रत्येक शाळेत बाल संसद स्थापन करण्यात आली आहे.

या बाल संसद अंतर्गत बाल मंत्रिमंडळाचे सदस्य यांच्या सोबत चर्चा करून करून त्यांना ज्या गोष्टींमध्ये रस आहे त्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आणि  योगा प्रशिक्षण असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!