छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व धाराशिव सब कॅम्पसमध्ये सहा इंटिग्रेडेट पदवी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव !

अभ्यासमंडळाच्या बैठकीत प्रकुलगुरुंनी घेतला आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य कॅम्पस व धाराशिव सब कॅम्पस मध्ये सहा इंटिग्रेडेट पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. प्रकुलगुुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी या तयारीचा आढावा घेण्यात आला.

चालु शैक्षणिक वर्षापासून ’नविन शैक्षणिक धोरण – २०२०’ विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागात तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमात सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मा.कुलगुुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक १७ जून रोजी घेण्यात आली. तर प्राचार्यांची बैठक मंगळवारी दि.२० घेण्यात आली. या अनुषंगाने चारही विद्याशाखातील अभ्यासमंडळ व विभागप्रमुखांच्या बैठका घेण्यात येत आहेत.

मानव्यविद्या शाखेतील २० अभ्यास शाखानिहाय मंडळाच्या अध्यक्ष, विभागप्रमुखांची बैठक महात्मा फुले सभागृहात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२३) बैठक घेण्यात आली. या बैठकीस अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. डॉ.अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. मानव्यविद्या शाखेंतर्गत १३ तसेच ७ तदर्थ अभ्यासमंडळे असे २० विषय आहेत. या विद्याशाखेंतर्गत तीन इंटिग्रेडेट पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत, असेही डॉ.अमृतकर म्हणाले.

यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबतीत आपले विद्यापीठ एक ’रोल मॉडेल’म्हणून पूढे येत आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याशाखेंतर्गत सहा इंटिग्रेडेट पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत. यामध्ये मानव्यविद्या शाखेंतर्गत
१. भारतीय भाषा -मराठी,हिंदी, ऊर्दु, संस्कृत, इंग्रजी, अरेबिक
२. विदेशी भाषा – जर्मन, चायनीज, रशियन
३. सामाजिक शास्त्र – अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, भुगोल व मानसशास्त्र

या तीन विषयात इंटिग्रेडेट बीए (ऑनर्स) कोर्स सुरु करण्यात येईल तर वाणिज्यशास्त्र विद्याशाखेंतर्गत एक अभ्यासमंडळ सुरु होत असून अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे यांच्यासह सदस्यांची बैठक गेल्या आठवड्यात झाली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत एक कोर्स व धाराशिव उपपरिसरात एक कोर्स सुरु होणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर तसेच आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.चेतना सोनकांबळे हे ही पदव्यूत्तर पदविका – ४४ क्रेडिट तर पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम ८८ क्रेडिटसच्या आठ विषय असणार आहे.

 ’मल्टीपल एंट्री, मल्टीपल एक्झिट’चा पर्याय- या इंटिग्रेडेट कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस तीन, चार व पाच वर्षांनी बाहेर पडण्याचा व प्रवेश घेण्याचा पर्याय मल्टीपल एंट्री मल्टीयल एक्झिट उपलब्ध असणार आहे. तसेच जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांनी बीए (ऑनर्स), बीकॉम (ऑनर्स) व बीएस्सी (ऑनर्स) ही पदवी मिळणार आहे. तसेच त्यांना केवळ एकच वर्षांनंतर पदव्यूत्तर पदवी देखील मिळेल, असे प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!