छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताचा स्वीय सहायक लाचेच्या जाळ्यात ! एक कोटी १३ लाखांचे बिल काढण्यासाठी टीव्ही सेंटरमधील एजंटच्या माध्यमातून ठेकेदाराकडून ऑनलाईन घेतले ६० हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – ठेकेदाराचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताचा स्वीय सहायक लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. एजंटाच्या माध्यमातून ऑनलाईन ६० हजार रुपये घेतल्याप्रकरणी स्वीय सहायकास अटक करण्यात आली. तर एजंट फरार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) मनोज सुभाष मारवाडी (वय 45 वर्षे, स्वीय सहाय्यक, अतिरिक्त आयुक्त छत्रपती संभाजीनगर मनपा, रा. विवेकानंदनगर प्लॉट नं 3 टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर), 2) महेंद्र कदम (वय 30 वर्षे, खाजगी व्यक्ती, रा. टी व्ही सेन्टर छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांनी त्यांचे जी 20 परिषदेकरीता शहरातील पूल, भिंती यांची रंगरंगोटी करण्याचे टेंडर भरून झोन 2, 3, 5 अंतर्गत कामे केली होती. त्याचे 1कोटी 13 लाख रुपयांचे बिल काढण्याकरिता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आतिरिक्त आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक मनोज मारवाडी यांनी 60,000 रुपये लाचेची मागणी केली. लाचेची ही रक्कम स्वीय सहाय्यक मनोज मारवाडी यांच्या सांगणेप्रमाणे 60,000 रुपयाची रक्कम टी व्ही सेंटर येथील खाजगी व्यक्ती महेंद्र कदम याने ऑनलाइन फोनपेद्वारे स्वीकारली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक – 31/05/2023 व 23/06/2023 रोजी लाचेची मागणी करण्यात आली. सुरवातीस 61,000/- रुपये लाच मागितली व तडजोडी अंती 60,000/- रुपये दिनांक 01/06/23 ऑनलाईन घेतले. त्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे, सापळा पथक – पो ना जीवडे, पो ना पाठक, पोशी विलास चव्हाण, चालक पोशी चंद्रकांत शिंदे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!