देश\विदेश

कोट्यातील शिक्षणाच्या दबावाने पुन्हा गळा घोटला!; ३ विद्यार्थ्यांची आत्‍महत्‍या!!

कोटा, दि. १३ ः राजस्थानच्या कोटातील शिक्षणाच्या दबावाने पुन्हा तीन विद्यार्थ्यांचा गळा घोटला आहे.  आत्‍महत्‍यांच्या दोन घटनांनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातील २ विद्यार्थी एका होस्‍टेलमध्ये राहत होते. कोटाचे पोलीस अधीक्षक केशर सिंह शेखावत यांनी यांनी सांगितले, की हे विद्यार्थी बिहारचे होते. एका प्रमुख कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होते. त्यांनी आज, १३ डिसेंबरला रात्री पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या घरात पंख्याला गळफास घेतला. यातील एक विद्यार्थी १९ तर दुसरा १८ वर्षांचा आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोघेही ११ वीत शिकत होते. गेल्या सहा महिन्यांपूर्वी एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोल्यांत राहत होते. आज सकाळी दोन्ही विद्यार्थी खोल्यांतून बाहेर न आल्याने घरमालकाला संशय आला. त्याने दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यामुळे घरमालकाच्या मित्रांनी दरवाजे तोडले असता दोन्ही विद्यार्थी सिलिंग फॅनला लटकलेले दिसले.

दोन्ही विद्यार्थ्यांची कोणतीही सुसाईट नोट समोर आलेली नाही. मोबाइलची तपासणी केली जात आहे. रविवारी रात्री जेवण केल्यानंतर दोघांनी आत्‍महत्‍या केल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यातील एका मुलाने रात्री आपल्या बहिणीला कॉल केला होता.

तिसऱ्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्‍महत्‍या
दुसऱ्या एका घटनेत १७ वर्षीय विद्यार्थ्याने विष पिऊन आत्‍महत्‍या केली. तो मध्यप्रदेशच्या शिवपुरीतील रहिवासी होता. तो कोट्यात मेडिकलमध्ये प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रतासहीत नीट परीक्षेची तयारी करत होता. तो दोन वर्षांपासून कोट्यात राहत होता.

तो काल रात्री पीजीच्या गॅलरीत बेशुद्धावस्थेत मिळाला. दुसऱ्या एका विद्यार्थ्याला तो दिसल्यानंतर त्याने घरमालकाला कळवले. नंतर या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!