महाराष्ट्र

मैत्रिणी नाहीत, जीवनाला कंटाळले…१८ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास!

नागपूर, दि. १४ ः जवळच्या मैत्रिणी नसल्याची खंत बाळगून १८ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मला मित्र नाहीत. त्यामुळे मी आनंदी नाही. जीवनाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली होती.

सानिका प्रवीण लाजूरकर ( शिव हाईट्स, पृथ्वीराजनगर, बेलतरोडी मार्ग, नागपूर) असे आत्‍महत्‍या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने १२ डिसेंबरला रात्री गळफास घेतला. तिचे वडील वर्धा येथील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक आहेत, तर आई एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. त्यांना सानिकासह दोन मुली असून सानिका नागपुरातील घरी राहते.

पती-पत्नी आणि लहान मुलगी वर्धेत राहतात. सानिका एमबीबीएस प्रवेशाची तयारी करत होती. क्‍लासेसला जात होती. काही दिवसांपासून ती तणावात राहत होती. मित्र-मैत्रिणी नसल्यामुळे तिला खंत वाटत होती. याच कारणामुळे तिने मृत्‍यूपूर्व चिठ्ठी लिहून ठेवत बेडरूममधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.

क्‍लासेसच्या शिक्षकांनी तिच्या पालकांना फोन करून सानिका अनुपस्थित असल्याची माहिती दिली. त्यामुळे तिच्या वडिलांनी नागपूर गाठले. घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!