गंगापूर

हद कर दी… थांबलेल्या रेल्वेच्या इंजिनमधून चोरले १४०० लिटर डिझेल!, लासूरस्टेशनमधील खळबळजनक घटना

लासूर स्टेशन, दि. १५ ः बिहारमध्ये रेल्वे इंजिन, लोखंडी पूल चोरी गेल्याच्या आश्चर्यजनक घटना चर्चेत असताना महाराष्ट्रातील चोरही कमी नसल्याचे दिसून आले आहे. त्यांनी उभ्या रेल्वेच्या इंजिनमधून अगदी कुणालाही न कळत काही वेळातच तब्बल १४०० लिटर डिझेल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशनमध्ये समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने या चोरीप्रकरणी तब्बल ७ जणांना अटक केली आहे.

संशयित सर्व लासूरचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे इंजिन लासूरला उभे होते. १४०० लिटर डिझेल काढून चोरट्यांनी गावातच विकले. रेल्वे सुरक्षा बलाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली. चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल केला.

सुरुवातीला या प्रकरणात दोघांना अटक केली होती. त्यांच्या माहितीवरून एकेक करत ७ जणांना ताब्यात घेतले. संशयितांनीही यापूर्वीही अशाप्रकारे रेल्वेच्या इंजिनमधून डिझेल चोरी केल्याची शक्यता आहे. रेल्वे सुरक्षा बल त्यांची कसून चौकशी करत आहे. मात्र या घटनेने अवघ्या औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!