छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

११ शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती ! उर्दुला झुकते माप, मराठी माध्यमाचे केवळ चौघे !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – महानगर पालिका अंतर्गत शाळांमधील ११ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमध्ये उर्दूच्या पदोन्नती मराठीच्या तुलनेत अधिक आहेत.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभागअंतर्गत  मराठी व उर्दू माध्यमाच्या ७० शाळा आहेत. या पैकी २६ शाळांमध्ये ग्रेडचे मुख्याध्यापक पद मान्य आहे. सध्या १५  मुख्याध्यापक कार्यरत आहेत व ११ पदे रिक्त आहेत.

मराठी माध्यमाचे चार आणि उर्दू माध्यमाचे सात असे एकूण ११ पदांवर प्रशासक तथा  आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीने शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादीनुसार पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती दिली आहे.

या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त ब. भी. नेमाने , मुख्य लेखापरीक्षक डॉ. देविदास हिवाळे, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी कागदपत्रांची छाननी करून पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण केली.

मराठी माध्यम- काळू बुधा चौधरी, मंगला केशव तायडे , आसाराम जनार्धन जाधव व  संपत निवृत्ती इधाटे.

उर्दू माध्यम- अर्जुमंद खातून अजमत उल्ला, शाकीरा बेगम सय्यद शफी, कौसर सायरा खाजा बहाउद्दीन, शाहीन फातिमा मोहसीन अहमद, सय्यद अब्रार सय्यद निसार, रईसा बेगम आयुब खान व सय्यद आबेदा बेगम खुर्शीद अली. यांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!