सिल्लोड
Trending

पोलचा करंट लागल्याने मुलगा मरता मरता वाचला ! जाब विचारला म्हणून पाच जणांनी मारले, सिल्लोड तालुक्यातील केर्‍हाळाच्या बसस्टॅंडवर राडा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – इलेक्ट्रिसिटी पोलचा करंट लागून मुलगा मरता मरता वाचला याचा जाब विचारला म्हणून पाच जणांनी बाप लेकाला मारहाण करून धमकावल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केर्‍हाळा बसस्टॅंडवर घडली. जगदिश दादाराव माने यास विजेचा शॉक लागल्याचे त्याच्या वडिलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

1) रामदास शामराव माने 2) दत्तु रामदास माने 3) आंबादास शामराव माने 4) विष्णु आंबादास माने 5) भाऊसाहेब आंबादास माने यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादाराव रघुनाथ माने (वय 40 वर्षे व्यवसाय शेती रा. केर्‍हाळा, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचे के-हाळा शिवारात गट क्र 59 मधे घर असून कुटुंबासह तेथे ते राहतात. दादाराव रघुनाथ माने यांच्या शेतातील लाईटच्या खब्यावरून रामदास माने, अबांदास माने विष्णु माने यांनी लाईट घेतली आहे.

सदर खब्याची वाईरींग व्यवस्थित वायरमने जोडली की नाही खात्री केली नाही. त्यामुळे दादाराव रघुनाथ माने यांचा मुलगा जगदिश माने यास दि. 02/06/2023 रोजी दुपारी 04.00वा सुमारास खब्या जवळ करंट लागला. दि. 03/06/2023 रोजी सकाळी 09.30वा सुमारास दादाराव रघुनाथ माने हे के-हाळा गावातील बसस्टॅंडवर गेले तेथे 1) रामदास शामराव माने 2) दत्तु रामदास माने 3) आंबादास शामराव माने 4) विष्णु आंबादास माने 5) भाऊसाहेब आंबादास माने हे उभे होते.

दादाराव रघुनाथ माने हे त्यांना म्हणाले की तुम्ही जर खब्यावरची वायरीग वायरमन कडून व्यवस्थित जोडली असती तर माझ्या मुलाला करंट लागला नसता माझा मुलगा मरता मरता वाचला आहे असे त्यांना दादाराव रघुनाथ माने व त्यांचे वडील रघुनाथ माने समजावत होते. त्यावेळी या पाच जणांनी दादाराव रघुनाथ माने व त्यांच्या वडीलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तुम्ही आमच्या नादी लागला तर तुम्हाला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी गावातील लोकांनी भांडण सोडवले.

याप्रकरणी दादाराव रघुनाथ माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!