राजकारण
Trending

जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; शरद पवारांनी घेतली अजितदादांकडून माहिती !

नागपूर दि. 23 डिसेंबर – महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर… जयंत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी… भ्रष्टाचारी सरकार हाय हाय… खोके लेनेवालों को जुते मारो सालों को…खोके सरकार हाय हाय… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत मिंधे सरकार निषेधार्थ आणि आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना प्रश्न मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सभागृहात केला जात होता याचा निषेध करण्याचा प्रयत्न विरोधी आमदारांनी केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सभात्याग करत पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार जयंत पाटील यांना उचलून घेत आमदारांनी ‘जयंत पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या निलंबन प्रकरणाची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादांकडून सविस्तर माहिती घेतली. सभागृहात नेमके काय घडले हे ही पवारांनी जाणून घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!