छत्रपती संभाजीनगर
Trending

सुतगिरणी चौक: पेट्रोल खाली सांडले, जाब विचारला म्हणून पंपावर ग्राहकाला दांड्याने हाणले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – गाडीत पेट्रोल भरत असताना काही पेट्रोल खाली सांडले. याबाबत जाब विचारला म्हणून पंपावर ग्राहकाला दांड्याने मारहाण केल्याच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बालाजी पेट्रोलपंप जानकी हॉटेलच्या बाजुला सुतगिरणी चौकाजवळ घडली.

शेख जावेद शेख हुसेन (वय ३२, रा. गारखेडा, नुरी मस्जीतजवळ) यांच्या फिर्यादीवरून सागर पाटीलसह दोघांवर जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख जावेद शेख हुसेन हे त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. बालाजी पेट्रोलपंपावर (जानकी हॉटेलच्या बाजुला सुतगिरणी चौकाजवळ) आरोपी सागर पाटील यांचेकडुन पेट्रोल भरत असताना काही पेट्रोल हे खाली सांडले. त्या बाबत फिर्यादी शेख जावेद शेख हुसेन यांनी त्यास विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ केली.

त्यानंतर दांड्याने फिर्यादी शेख जावेद शेख हुसेन यांना डोक्याला, हाताला, पाठीला मारहाण करुन जखमी केले. याचवेळी एका अनोळखी मुलाने फिर्यादी शेख जावेद शेख हुसेन यांना श्रीमुखात भडकावली. या आशयाची तक्रार शेख जावेद शेख हुसेन यांनी दिली आहे.

याप्रकरणी र गु.र.न. 328/2022 कलम 324,323,5 04,34 भादवि प्रमाणे जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सफौ गोरक चव्हाण करीत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!