छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

आंतर विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ जाहीर !

औरंगाबाद, दि.२४ : आंतर विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुले व मुली प्रत्येकी सहा खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

भूवनेश्वर के.आय.आय.टी. विद्यापीठात २४ ते २७ डिसेंबर दरम्यान आंतरविद्यापीठ योगा स्पर्धा होत आहेत. डॉ.सुहास यादव हे संघाचे व्यवस्थापक तर डॉ.माधव इंगळे हे प्रशिक्षक आहेत. या संघास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे व क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.

या संघात मुले : प्रशांत जमदाडे ,साईचंद्रा वाघमारे ,संभाजी चव्हाण ,मोहित थोरात, सचिन मोहिते, चेतन काटे तर  मुली : अंकिता भोकरे, जयश्री जाधव, ऋतुजा पारसकर,पल्लवी साबळे, पूजा राठोड ,गायत्री गर्डे यांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!