छत्रपती संभाजीनगर
Trending

19 वीजचोरांवर गुन्हा दाखल, महा‍वितरणची धडक कारवाई ! मीटरमध्ये फेरफार व आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांत खळबळ !!

नारेगाव परिसरातील विविध वसाहतींत कारवाई

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ : नारेगाव परिसरातील विविध वसाहतींत महावितरणने वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवत एकाचवेळी 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

नारेगाव परिसरात काही ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून तसेच लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची माहिती महावितरणला मिळाली. यावरून चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता सतीश अधाने, वरिष्ठ तंत्रज्ञ ‍विनोद ‍तित्तर, प्रेमचंद चव्हाण, अकिल पठाण व विद्युत सहायक आय.एल.शेख यांनी 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान तपासणी मोहीम राबवली.

त्यात आयेशा कॉलनीतील अब्दुल जब्बार शेख, रफिक पटेल (वापरकर्ता सय्यद इम्रान अकिल), रंगरेज इश्तिकुए पीर मोहंमद, आयेशा मशिदीजवळील मुन्नीबी अब्दुल गफार शेख, मोहंमद फारूख शेख इस्माईल, चमचमनगरमधील फारूख इस्माईल शेख, अजीज कॉलनीतील इम्रान मोहंमद खिझर, अमीर रहेमान शेख, साहिबा बेगम हसन चाऊस, नारेगावातील सलमान सलीम खान, मुसा इब्राहीम शेख, अख्तारी बेगम खान, अमिना पार्कमधील मोहंमद सादिक जफर, रुमाना परवीन अफरोज खान, इम्रान रफिक शेख, मुमताज बेगम शब्बीर शेख, अस्लम पार्कमधील कासिम रज्जाक शेख, अन्वर जानी मशिदीजवळील सय्यद जावेद बशीर व असिफ कॉलनीतील सय्यद शफिक कैसर हे 19 जण हे वीजचोरी करताना आढळून आले.

या सर्वांनी घरगुती वापरासाठी विद्युत वाहिनीवर आकडे टाकून 1 लाख 14 हजार रुपयांची वीजचोरी केली. या रकमेसह सर्वांना प्रत्येकी 2 हजारांप्रमाणे 38 हजारांचे तडजोड शुल्हकी भरावे लागणार आहे. या प्रकरणी सहायक अभियंता सतीश अधाने यांच्या फिर्यादीवरून 19 जणांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!