छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आशा वर्कर, कंत्राटी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उद्या महत्त्वाची बैठक ! या विषयावर घेणार आयुक्त मीटिंग !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – शहरातील कच-याचे वर्गीकरण करणे व स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली उद्या, ६ जुलै रोजी बैठक आयोजिली आहे. आरोग्य विभागातील वर्ग-3 चे स्थायी व कंत्राटी व आशा वर्कर, आरोग्य विभाग कर्मचा-यांना या बैठकीस बोलावण्यात आले आहे.

‘स्वच्छता अभियान अंतर्गत शहरातील विविध आस्थापना व निवासी नागरीक यांच्याकडे निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण करणे व स्वच्छते संदर्भात जनजागृती करणे यासाठी दिनांक 06/07/2023 गुरुवार रोजी सकाळी 07.00 वाजता संत एकनाथ रंग मंदिर, उस्मानपुरा येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिपत्याखालील वर्ग-3 चे स्थायी व कंत्राटी व आशा वर्कर, आरोग्य विभाग कर्मचा-यांना या बैठकीस बोलवण्यात यावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!