महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी, शाळा, दवाखाने यासारख्या सुविधा प्रत्येक तांड्यावर उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व ‘नंगारा बोर्ड’ स्थापणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम- ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी वनार्टी’ (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी येथे केली. दरम्यान, अंगणवाडी, शाळा, दवाखाने यासारख्या सुविधा प्रत्येक तांड्यावर उपलब्ध करून देऊ, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व 593 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेत्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

 या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोडग्रामविकास मंत्री गिरिश महाजनबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेजिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेमहंत बाबुसिंग महाराजखासदार भावना गवळीखासदार प्रतापराव जाधवउमेश जाधवआमदार सर्वश्री ॲड. किरण सरनाईकराजेंद्र पाटणीसंतोष बांगरइंद्रनील नाईक, संजय रायमुलकरनिलय नाईकविभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टेजिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंतपोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी पारंपरिक बंजारा पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील 593 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणा-या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणीरस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळादवाखानेअंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीविकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.  नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच शासन सकारात्मक आहेअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!