छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महानगरपालिका देणार डिजिटल हेल्थ आयडी कार्ड ! देशभरात कुठेही उपचार घ्या, एका क्लिकवर मिळेल हेल्थ हिस्ट्री, आरोग्याचे सर्व रेकॉर्ड राहणार सुरक्षित !!

आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA CARD) कार्डसाठी विशेष मोहीम

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – आयुष्यमान भारत डिजीटल अभियाना (ABDM) अंतर्गत भारतातील सर्व नागरिकांना एक डिजीटल हेल्थ आयडी कार्ड दिले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य संबंधीचे सर्व रेकॉर्डस डिजीटल स्वरुपात स्टोर राहणार आहे.

संबंधीत रुग्ण भारतातील कोणत्याही ठिकाणी उपचार घेत असेल त्या रुग्णांची आधी कोठे उपचार घेतले होते, त्याला कोणता आजार आहे आदी व त्याच्या वैद्यकीय उपचाराची सर्व माहिती दिलेली असणार आहे. लोकांना आपल्या आरोग्य विषयक सर्व नोंदी डिजीटल स्वरुपात एकाच ठिकाणी ठेवता येणार आहे.

या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य केंद्र येथे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA CARD) कार्ड बनविण्या संदर्भात दि. १९/०५/२०२३ ते दि. १५/०६/२०२३ दरम्यान विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रात सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत जावून आपले ABHA CARD बनवून घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

ABHA CARD बनविण्या करीता आपला आधारकार्ड नंबर व त्यास सलग्न मोबाईल नंबर घेवून यावा, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!