जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 11- पडेगाव, मिटमिटा परिसरातील अनधिकृत प्लॉटिंग औरंगाबाद मनपाने निष्कासित केली. आज, 11 जून रोजी दुपारी तीन वाजेपासून ते सायंकाळपर्यंत या भागातील गट क्रमांक दोनशे पस्तीस गट क्रमांक 2 व इतर गट क्रमांक मधील जवळपास आठ ते दहा एकरवरील प्लॉटिंगवर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, औरंगाबादेत लॉकडाऊन उघडताच एजंटाच्या माध्यमातून खुलेआम नोटरीच्या आधारे प्लॉटची विक्री सुरु आहे. असे असले तरी मनपाची यावर करडी नजर असून पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील मिटमिटा परिसरात अनधिकृत प्लॉटिंग टाकण्यात आली होती. ही प्लॉटिंग मुख्य रस्त्यालगत व आतील भागात करण्यात आली होती. याबाबत मा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी या परिसरातील सर्व प्लॉटची पाहणी करून नगररचना विभागाकडून सविस्तर रेखांकन बाबत माहिती घेतली व कारवाईचे आदेश दिले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानुसार आज, 11 जून रोजी दुपारी तीन वाजेपासून ते सायंकाळपर्यंत या भागातील गट क्रमांक दोनशे पस्तीस गट क्रमांक 2 व इतर गट क्रमांक मधील जवळपास आठ ते दहा एकरची प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली आहे. सदर प्लॉटिंग हे एजंट नियुक्त करून खुलेआम नोटरीच्या आधारे विक्री करत आहे. याबाबत यापूर्वी या भागातील अनधिकृत प्लॉटिंग धारका विरुद्ध छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी देखील हे अनधिकृत प्लॉटींग सुरुच होती.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या भागात अनधिकृत प्लॉटींग करून विकण्याचा सपाटा लावला होता. सदर अनधिकृत प्लॉटींग आज पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहे. तसेच पहाडसिंगपुरा रोड वर मंडप व्यवसायिक पुंड यांनी नाल्यामध्ये बांधकाम सुरू केले होते ते बंद करण्यात आले आहे. सदर कारवाई प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद व पोलीस पथक चे कर्मचारी गायकवाड, राजपूत, ठाकरे, पठाण यांनी कारवाईत सहभाग घेतला. अनधिकृतपणे प्लॉटिंग धारका विरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणार आहे, अशी माहिती रविंद्र निकम यांनी दिली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here