टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने मुंबईचे आझाद मैदाण दणाणले ! मानधन व पेन्शनसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक !!

मुंबई, दि. ३ – भरघोस मानधन वाढ, राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, निवृत्तीनंतर पेन्शन यासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी आंगणवाडी सेविकांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात केली. घोषणांनी मैदाण दणाणून सोडले. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन मागण्या स्वीकारून सकारात्मक घोषणा करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा काही अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त प्रणाम करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून अंगणवाडी सेविकांनी आंदोलनास सुरुवात केली. या सरकारचा करायचं काय… खाली मुंडकं वर पाय…, मानधन वाढ झालीच पाहिजे आदी घोषणांनी अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदान दणाणून सोडले.

अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचार्यांचा कायम स्वरुपाचा दर्जा देण्यात यावा, मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी, नादुरुस्त मोबाईल बदलून द्यावे, त्यातील अॅप मराठीत असावे यासह प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मुळात अंगणवाडी सेविकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शासकीय सेवेत कायम करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मानधनात तातडीने भरघोस वाढ करा, दरवेळी मानधन वाढीचे केवळ आश्वासन मिळत आहे मात्र प्रत्यक्षात कोणतीही मानधन वाढ झालेली नाही.

शासनाने २०१९ मध्ये जे मोबाईल दिले होते ते सर्व मोबाईल नादुरुस्त आणि कालबाह्य झालेले आहेत. यामुळे अंगवाडी सेविकांना ऑनलाईन काम करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कहर म्हणजे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरून काम करण्याचे फर्माण सोडले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले बिनकामाचे हे मोबाईल बदलून दुसरे चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली.

सध्या अंगणवाडी सेविका या अंत्यत तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर तर अंगणवाडी सेविकांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना लागू करावी. दरम्यान, कोविड काळात प्रत्यक्ष फिल्डवर जिवाची पर्वा न करता अंगणवाडी सेविकांनी काम केले. त्यावेळी अंगणवाडी सेविकांचे केवळ तोंडी कौतुक करण्यात आले. मात्र, प्रलंबित मागण्यांवर केवळ सकारात्मक असल्याचे सांगूण सरकारने तोंडाला पाने पुसली. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून आता तातडीने प्रलंबित मागण्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

संबंधीत या बातम्याही वाचा-

अंगणवाड्यांचे समायोजन होणार: ग्रामीण प्रकल्पामधील जी अंगणवाडी केंद्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांचे नागरी प्रकल्पात समायोजन करण्याचा निर्णय !

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !

आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !

आशा व गट प्रवर्तकांना २६ हजार पगार देऊन आरोग्य विभागात कायम दर्जा द्या ! आंदोलनाने मिनी मंत्रालय दणाणले !!

आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !

 

Back to top button
error: Content is protected !!