ADS 2

औरंगाबाद, दि. 27 -: औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा / ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणे आहेत. सर्व इच्छुकांनी प्रवर अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद- 431 001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षंकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच खालील नमुन्यातील अर्जांसह दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4. 00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद यांनी कळविले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठीचे पात्रता निकष पूढील प्रमाणे आहे. वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष, शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. श्रेणी – सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त ‍शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार/ इतर विमा कंपन्यामध्ये माजी अभिकर्ते / स्वयंरोजगार वा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे करण्यात येईल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक. निवड झालेल्या उमेदवारास रु. 5000/- ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक जी कि राष्ट्रीय बचत पत्र / किसान विकास पत्र स्वरुपात असेल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जो IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल. असेही प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

विमा एजंटची नेमणूक करण्यासाठी अर्ज –

  1. संपूर्ण नाव:
  2. जन्म दिनांक:
  3. राष्ट्रीयत्व:
  4. वडिलांचे/पतीचे नाव:
  5. सध्या रहात असलेला पत्ता:
  6. मूळ पत्ता:
  7. शैक्षणिक पात्रता:
  8. विमा क्षेत्रातील इतर अनुभव (असल्यास) :
  9. मोबाईल क्रमांक:
    दिनांक:- (उमेदवाराची स्वाक्षरी)

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा