Advt A
Home ताज्या बातम्या घनसावंगीत 11 शासकीय निवासस्थानांच्या 275 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता, अंबडला 8 निवासस्थाने व...

घनसावंगीत 11 शासकीय निवासस्थानांच्या 275 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता, अंबडला 8 निवासस्थाने व एका विश्रामगृहाच्या बांधकामास मंजुरी !

मुंबई, दि. 2 : जालना जिल्ह्यातील मौजे घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टाईप 1 ते 4 चे एकूण 11 निवासस्थांनाच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या निवासस्थानांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निवासस्थानांचे बांधकाम सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अंबड येथे 8 शासकीय निवासस्थाने व एका विश्रामगृहाच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चार सूटचे शासकीय विश्रामगृह बांधण्यास तसेच टाईप 1 व 2 प्रकारची 8 शासकीय निवासस्थानांच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रस्तावांच्या एकूण 376.66 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विनंतीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये अंबड येथे चार सूटचे नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी 192.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टाईप 1 व 2 प्रकारच्या आठ निवासस्थानांच्या बांधकामासाठी 184.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास ही यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. अंबडमध्ये सुसज्ज व परिपूर्ण असे विश्रामगृह व शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या सूचना चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

error: Content is protected !!