फाईल फोटो.
ADS 2

औरंगाबाद, दि. 27 : खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात विविध मागणी व मुद्दे उपस्थित करुन औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान ११५ किमी नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी केली होती त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सदरील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार इम्तियाज जलील यांनी १५ व १६ मार्च रोजी लोकसभेत मराठवाडा व औरंगाबादेतील रेल्वे विकास करण्याबाबत विविध मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, औरंगाबादला आधुनिक रेल्वे स्थानकासाठी मान्यता देण्यात यावी, औरंगाबाद – चाळीसगाव रेल्वे मार्ग बांधण्यात यावे, औरंगाबाद पुण्याशी जोडण्यात यावे तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासात्मक कामासाठी वाढीव निधी देण्यात यावी असे विविध मुद्दे उपस्थित करून त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे विभागाचे विकास होवून रेल्वेस्थानकांवर यात्रेकरुंना अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी उपस्थित केलेल्या प्रस्ताव व विकास कामांबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुद्देनिहाय प्रस्ताव, मागण्या व कामांबाबत केंद्र शासनाच्या रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पत्राव्दारे खासदार इम्तियाज जलील यांना पुढील प्रमाणे कळविला आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

१. औरंगाबादला आधुनिक रेल्वे स्थानकासाठी मान्यता देण्यात यावी
औरंगाबाद हे उपनगरी श्रेणी -२ रेल्वेस्थानक आहे, निकषांनुसार या रेल्वे स्थानकात किमान अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हे रेल्वे स्टेशन मॉडेल, मॉडर्न आणि आदर्श स्टेशन योजनांच्या अंतर्गत यापूर्वीच विकसित केले गेले आहे. या रेल्वे स्थानकात इमारत दर्शनी भागाची सुधारणा, बुकिंग व चौकशी कार्यालय, जल बूथांचे नूतनीकरण, प्रतिक्षालय व विश्रामगृहे यासारख्या अतिरिक्त सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

२. औरंगाबाद – चाळीसगाव रेल्वे मार्ग बांधण्यात यावे
औरंगाबाद – चाळीसगाव नवीन मार्ग (एकून ९३ किमी) चा सर्वेक्षण वर्ष २०१७-१८ मध्ये पूर्ण झालेला आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, प्रकल्पाची किंमत १६८९.५१ कोटी रुपये इतकी असून नकारात्मक परतावा (-) २.२३ टक्क्यांसह असल्याने सदरील प्रस्तावावर पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होवु शकली नसल्याचे नमूद केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

३. औरंगाबाद – अहमदनगर मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करावे
औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी (११५ किमी) सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर आणि संबंधित निकालांची पुष्टी झाल्यावरच प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

४. औरंगाबादला पुण्याशी जोडण्यात यावे
औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी (१५५ किमी) सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. अहमदनगर दौंड मार्गे यापूर्वीच पुण्याला जोडलेले आहे. अहमदनगर ते पुणे दरम्यान प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी अहमदनगर – दौंड रेल्वेमार्ग दोहरीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी दौंड ते पुणे दरम्यान दुहेरी ओळ आधीच आस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

५. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला केवळ ६० कोटी रुपये दिले आहेत, ते वाढविण्यात यावेत
सन २०२०-२१ मध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासाठी रेल्वे मंत्रालयाची मागणी क्रमांक ८४ च्या भांडवलाच्या अंतर्गत ३८७.५५ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे. सन २०२१-२२ या वर्षाच्या अंदाजपत्रकात ६९९ कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आल्याचे नमूद केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा