ADS 2

औरंगाबाद, दि. ६ – राजकीय दृष्ट्या समर्थ असलेला पण जात पात आणि धर्माच्या संर्घषात आकांत बुडलेल्या भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या रुपाने १७५७ मध्ये भारतात एका नव्या शोषकाची भर पडली, त्यानंतर कोणतीही दया माया न दाखवता सगळ्या अनितीचा आणि गैरमार्गाचा वापर करून ईस्ट इंडीया कंपनीने आपले साम्राज्य वाढवले. असं मत नांदेड येथील पिपल्स महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने आयोजित आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानात ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभापासून ते १७५७ च्या प्लासीच्या लढाईपर्यंतची वाटचाल डॉ. चिरडे यांनी सांगितली.

आधुनिक जगाचा आरंभ १४५३ ला कॉन्स्टेंटिनोपलच्या युद्धानंतर झाला. या युद्धामुळे युरोप आणि आशियाचा अखंड चालणारा व्यापार तुर्कांनी बंद केला. आशिया खंडातून युरोपला जाणारे तीनही मार्ग कॉन्स्टेंटिनोपलला एकत्र येत होते. या मार्गावरच तुर्कांनी सत्ता काबीज केल्यामुळे युरोप एकाकी झाला. या एकाकीपणातून बाहेर येण्यासाठी आणि भारताशी व्यापार प्रस्थापित करण्यासाठी युरोपने सागरी मार्गांची चाचपणी केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वास्को द गामा या पोर्तुगीज खलाश्याने ‘केप ऑफ गुड होपला’ वळसा देऊन १४९८ मध्ये भारतात प्रवेश केला. भारतीय जमीनीवर युरोपीय खलाशांचे हे पहिले पाऊल होते. पोर्तुगीजांप्रमाणेच स्पॅनीश,डच, फ्रेंच, ब्रिटीश हे जग पादाक्रांत करु लागले. युरोपीयांना भारत हा सर्वार्थाने समृद्ध असा देश वाटला. पोर्तुगीज आणि डचानंतर ब्रिटीशांनी भारतात आपले पाऊल ठेवले असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

युरोपीयन त्याकाळी चांदी आणत असत आणि भारतातील सुंदर कापड, मसाल्याचे पदार्थ, नीळ युरोपमध्ये विकून प्रचंड नफा कमवत. त्याकाळी जगाच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन एकट्या भारतामध्ये केले जात होते. या व्यापारातून मुघलांना किमान एक कोटी रुपये महसूली उत्पन्न मिळत होते. भारत हा जगातील महत्वाचा देश असून भारतातील अनेक शहरांमध्ये त्याकाळी आशिया खंडातल्या विविध देशातल्या लोकांची गर्दी पहायला मिळत होती असे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. त्याकाळातील अनेक प्रवाशांनी भारताच्या वैभवाचे तोंड भरुन कौतूक केल्याचं पाहायला मिळतं असल्याचंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. बालाजी चिरडे यांनी दिलेले हे व्याख्यान आज आपण आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून दिनांक ७ सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे. याचबरोबर आकाशवाणी समाचार औरंगाबाद AURANGABAD AIR NEWS या यूट्यूब चॅनलवरही त्याचे ऑनलाईन प्रसारण होईल. त्यानंतर पुढील काळातही या यूट्यूब चॅनलवर ते श्रोत्यांना कधीही ऐकता येईल. या व्याख्यानमालेत पुढचे व्याख्यान येत्या शुक्रवारी दिनांक दहा सप्टेंबरला सहा वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित होईल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा