महाराष्ट्र
Trending

संभाजीनगरच्या कोर्टात तडजोडीचे सात लाख जमा करण्यासाठी निघालेल्या बीड गेवराईच्या दोघांना पाचोडजवळ लुटले ! अंबड पोलिस स्टेशनमध्ये ७ जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह दि. १७- संभाजीनगरच्या कोर्टात तडजोडीचे सात लाख जमा करण्यासाठी निघालेल्या बीड गेवराईच्या दोघांना पाचोडजवळील धुळे सोलापूर हायवे वरिल भोकरवाडी माळेवाडी टोल नाका परिसरात लुटले. कारमध्ये आलेल्या ७ जणांनी मोटारसायकस्वार दोघांवर हल्ला चढवून ७ लाखांची थैली हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकिशोर भिकाजी वैराळ (वय 40 वर्षे व्यवसाय शेती रा. मनुबाई जवळा ता. गेवराई जि. बीड) हे घाटीत दाखल असून त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचा लहान भाऊ महादेव भिकाजी वैराळ याचे विरुध्द त्याचे सासरचे लोकांनी छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात केस टाकलेली आहे. त्या केस मध्ये दि. 15/04/2023 रोजी साडे तेरा लाखांत तडजोड असल्याने नंदकिशोर भिकाजी वैराळ यांच्या भावाचा मेव्हणा विलास आसाराम गायकवाड (रा. सानकवाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर याचे खातेवर सात लाख रुपये आरटीजीएस दिनांक 17/02/2023 रोजी पाठविले होते. व उर्वरीत रक्कम साडेसहा लाख रुपये नंदकिशोर भिकाजी वैराळ हे त्यांचा भाऊ महादेव दि. 15/04/2023 रोजी घेवून जाणार होते.

दि. 15/04/2023 रोजी नंदकिशोर भिकाजी वैराळ हे व त्यांचा भाऊ महादेव भिकाजी वैराळ मोटारसायकलने दुपारी एक वाजेच्या सुमारास गेवराई येथून एकूण सात लाख रुपये एका थैलीत घेवून छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात जमा करण्यासाठी निघाले. रस्त्यात पाचोड (ता. पैठण) समोर धुळे सोलापूर हायवे वरिल भोकरवाडी माळेवाडी टोल नाका अगोदर अंदाजे 50 मीटर च्या अंतरावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जात असताना त्यांच्या मोटारसायकलसमोर पाठीमागून पाचोड कडून येणारी कार अचानक येवून थांबली.

त्या कारमधून नंदकिशोर भिकाजी वैराळ यांच्या भावाचा मेव्हणा 1) सचीन नामदेव नेमाणे 2) ज्ञानदेव नेमाणे 3) गणेश ज्ञानदेव नेमाणे 4) सोमनाथ नेमाणे 5) लखण नेमाणे 6) नामदेव नेमाणे सर्व (रा. पाचोड ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) व त्यांचा पाहुणा धर्मराज नारायण वैद्य (रा. शिरनेर ता. अंबड) हे उतरले. त्यांनी दोघांना शिवीगाळ करुन तडजोडीचे पैसे येथेच द्या असे म्हणून वाद करू लागले.

नंदकिशोर भिकाजी वैराळ हे त्यांना म्हणले की, पैसे आज कोर्टात द्यायचे आहे तुम्ही येथे का पैसे मागता असे त्यांना म्हणत असतांना नंदकिशोर भिकाजी वैराळ यांच्या भावाचा मेव्हणा सचिन नेमाणे याने कार मधून लोखंडी रॉड काढून नंदकिशोर भिकाजी वैराळ यांच्या डोक्यात मारत असतांना लोखंडी रॉड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवयीवर लागला. व गणेश ज्ञानदेव नेमाणे, ज्ञानदेव नेमाणे, सोमनाथ नेमाणे, लखण नेमाणे, नामदेव नेमाणे व त्यांचा पाहुणा धर्मराज नारायण वैद्य यांनी कार मधून काठ्या व सळई काढून नंदकिशोर भिकाजी वैराळ यांच्या पाठीवर व दोन्ही पायावर मारहाण करत असताना भाऊ महादेव हा भांडण सोडविण्यास आला असता त्याला पण काठीने व सळई ने मारहाण केली व त्याच्या हातातील थैली ज्यामध्ये तडजोडीचे एकूण सात लाख रुपये असलेली सचिन नामदेव नेमाणे व गणेश ज्ञानदेव नेमाणे यांनी हिसकावून घेतली.

नंदकिशोर भिकाजी वैराळ यांना व त्यांच्या भावाला म्हणाले की, तुम्ही जर आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला जिवंत मारून टाकू असे धमकावून पसार झाले. त्यानंतर जखमी नंदकिशोर भिकाजी वैराळ व त्यांच्या भावाला घाटीत दाखल करण्यात आले.

नंदकिशोर भिकाजी वैराळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1) सचीन नामदेव नेमाणे 2) ज्ञानदेव नेमाणे 3) गणेश ज्ञानदेव नेमाणे 4) सोमनाथ नेमाणे 5) लखण नेमाणे 6) नामदेव नेमाणे सर्व (रा. पाचोड ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) व धर्मराज नारायण वैद्य (रा. शिरनेर ता. अंबड) यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!