ADS 2

नवी दिल्ली, दि. 14 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई दिलासा निधीत, एक जुलै 2021 पासून 28 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या असलेल्या मूळ वेतन/पेन्शनच्या 17 टक्के इतका महागाई भत्ता/दिलासा कर्मचाऱ्यांना मिळत होता, त्यात या निर्णयाने 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोविड-19 मुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन, महागाई भत्त्याचे तसेच महागाई दिलाशाचे तीन हप्ते, जे 01जानेवारी 2020, 01 जुलै 2020 आणि 01 जानेवरी 21 ला देय होते, ते देण्यात आले नव्हते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आता सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई हप्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा, 01.07.2021 पासून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 28 टक्क्यांपर्यंत केली जाणार आहे. ही वाढ, आधीच्या तीन देय वाढीशी सुसंगत आहे. मात्र, 01.01.2020 ते 30.06.2021 या कालावधीतील महागाई हप्ता/दिलासा 17 टक्के एवढाच कायम राहणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा