फाईल फोटो
जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 10 – पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मंडपच्या व्यवसायासाठी 10 लाखांच्या कर्जाची फाईल मंजूर करण्यासाठी व्यवसायिकाकडे एक लाखाच्या लाचेची सतत मागणी केल्यामुळे अखेर पुण्यातील सीबीआयच्या एसीबीने पैठण गेट येथील युनियन बँकेच्या वसुली अधिकाऱ्याला अटक केली. सुरेश भालेराव असे अटक केलेल्या त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी औरंगाबाद शहरातील इंगळे या युवकाने पैठण गेट येथील युनियन बँकेकडे 10 लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. कर्ज घेण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती सर्व त्याने बँकेला दिली होती. सर्व कागदपत्रे देऊनही बँक आपल्याला कर्ज देत नाही, असा अनुभय इंगळे यांना पदोपदी येत होता. दरम्यान, सन २०२० मधील नोव्हेंबरमध्ये बँकेतील वसुली अधिकारी सुरेश भालेराव हा बँकेबाहेर इंगळे याला भेटला. कर्ज प्रकरणाबाबत इंगळेकडे त्याने विचारणा करून बँक व्यवस्थापक जयप्रकाश झा याच्याशी बोलून नंतर सांगतो असेही तो म्हणाला. त्यानंतर भालेराव म्हणाले की, कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी झा तयार आहेत. परंतू त्यांना खुश करावे लागेल असे सांगून त्याने अदालत रोडवरील एका हॉटेमध्ये इंगळेला भेटायला बोलावले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अडीच लाख दे नाहीतर कर्जाची फाईल नामंजूर करतो..
दरम्यान, भालेराव याच्या सांगण्याप्रमाणे इंगळे हॉटेलमध्ये गेला. दहा लाखांचे कर्ज प्रकरण मंजूर होईल. परंतू त्यासाठी सबसिडीची रक्कम असलेले अडीच लाख रुपये झा यांना द्यावे लागतील, असे भालेराव इंगळेला म्हणाला. कर्जातील एकूण रकमेपैकी जर तुम्हाला एवढे पैसे दिले तर मला व्यवसाय करण्यासाठी फारच कमी रकम राहील, उर्वरित रकमेवर मी व्यवसाय कसा करणार असा प्रश्नही इंगळेने यावेळी उपस्थित केला. काय करायचं ते आताच सांग, नाहीतर तुझ्या कर्जाची फाईल नामंजूर केली जाईल, अशी धमकीच भालेराव याने दिली. अखेर तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या रकमेची मागणी इंगळेकडे करण्यात आली. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन इंगळेनेही पैसे देण्याचे मान्य केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

एक लाख दिले तरच कर्जाची रक्कम जमा होईल
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सन २०२१ मधील जानेवारीत इंगळेला दहा लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे ऑनलाईवरून कळले. पुढे इंगळेने सतत पाठपुरावा करून बँकेत खेट्या मारल्या. कर्जाची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची विचारणा केली. कर्जाची फाईल झा याच्या टेबलवर असल्याचे इंगळेला कळले. कालांतराने भालेराव इंगळेला झा याच्याकडे घेऊन गेला. त्याच्याशी बोलणे करून दिल्यावर झा याने सध्या पाच लाख रुपये खात्यात जमा करतो. पण ठरलेले एक लाख रुपये लगेच द्यावे लागतील असे तो म्हणाला. ठरलेले पैसे दिले नाही तर कर्जाची उर्वरीत रक्कम खात्यात जमा होऊ देणार नाही, असेही तो म्हणाला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

2 जून रोजी तक्रार दिली, खातरजमा करून झाली अटक
ठरल्याप्रमाणे दि. ९/०३/२०२१ रोजी इंगळेच्या खात्यात पाच लाखांची रक्कम जमा झाली. त्यानंतर भालेराव आणि झा यांनी सतत एक लाखाच्या रकमेसाठी इंगळेकडे तगादा लावला. याला कंटाळून इंगळेने पुण्यातील सीबीआयच्या एसीबीकडे २ जून रोजी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. एम. आर. कोडाळे, पोलीस निरीक्षक मुकेश प्रचंड यांच्या पथकाने भालेरावला अटक केली. दरम्यान, व्यवस्थापक जयप्रकाश झा याच्याविरुध्द पुरावे सीबीआयच्या हाती लागले नसल्याचे सूत्रांना सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here