ADS 2

औरंगाबाद, दि. 26 – औरंगाबाद येथील गरीब व होतकरू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शाळा सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. यात उस्मानपुरा व गारखेडा या शाळेत ही सोय करण्यात आली आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या शाळेमध्ये सीबीएसई प्रवेशासाठी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत आहे. आजपर्यंत उस्मानपुरा शाळेत 24 प्रवेश व गारखेडा शाळेत 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहे. प्रवेशाचा ओघ पाहता लवकरच या शाळांमध्ये हाऊसफूल्लचा बोर्ड आपल्याला पहावयास मिळेल, अशी माहिती उपायुक्त डाॅ. संतोष टेंगळे यांनी दिली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. एलकेजी, यूकेजी, फर्स्ट आणि सेकंड हे चार वर्ग या शाळांमध्ये सुरु करण्यात आलेले आहे.

ज्या मुलांना सीबीएसई मधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना एल् केजी, यु केजी, फर्स्ट आणि सेकंड या चार वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षक अत्यंत हुशार व विद्यार्थी प्रिय आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या शिक्षकांमधूनच निवड करून पंचवीस ते तीस शिक्षक सीबीएससीचे वर्ग घेण्यासाठी निवडले आहेत. या सर्व शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सर्व शिक्षक सीबीएससी अभ्यासक्रम शिकवत आहेत. या दोन्ही शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या दोन्ही शाळेत सीबीएसई वर्ग योग्यप्रकारे चालविण्यासाठी शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, सर्व स्तरातील मुलामुलींना प्रवेश मिळावा, प्रत्येक पालकाला ही शाळा आपली वाटावी या हेतूने प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने,उपायुक्त डाॅ. संतोष टेंगळे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा