छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरात RRR केंद्र उभारणार ! प्रत्येक झोनमध्ये नऊ ठिकाणी केंद्र उभारण्याचे आदेश !!

RRR केंद्रामार्फत कचऱ्याचा पुनर्वापर, 5 जून रोजी उत्कृष्ट RRR केंद्राला बक्षीस, सर्व नागरिकांच्या सहभाग अपेक्षित

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४: केंद्र सरकारच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 15 मे पासून तीन अठवड्यासाठी ‘ माझा स्वच्छ शहर ‘ हा अभियान राबवणार आहे. रेड्युस, रीयुज, रिसायकल (आर आर आर) अर्थात कचरा कमी करणे, कचऱ्याचे पुनर्वापर करणे व त्याचावर प्रक्रिया करून नवीन उपयोग करणे ह्याचाबद्दल जनजागृती करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत ह्यांचा मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग व वॉर्ड कार्यालय सर्व नागरिकांचा सहभागाने ‘ माझा स्वच्छ शहर ‘ हा अभियान 15 मे ते 5 जून 2023 पर्यंत पूर्ण क्षमतेने राबवणार आहे. मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या देखरेखीखाली आयोजित या अभियानांतर्गत शहरात प्रत्येक झोन मध्ये अर्थात नऊ ठिकाणी आर आर आर केंद्र उभारण्यात येणार आहे.

आर आर आर अर्थात रीयुज, रेड्यूस, रिसायकल केंद्रामध्ये शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, बुट, बॅग, फर्निचर, भांडे व अन्य साहित्याचे संकलन होणार आहे. या केंद्रामार्फत जमा झालेल्या कचऱ्याला योग्य पद्धतीने प्रक्रिया करून किंवा नूतनीकरण करून पुनर्वापर करण्यात येईल. हे आर आर आर केंद्र रहिवासी अथवा व्यापारी संकुलात किंवा मोकळे मैदानात उभारण्यात येणार आहे. 20 मे 2023 रोजी झोन पातळीवर या आर आर आर केंद्राचे उद्घाटन करण्यात येईल.

मनपा व स्मार्ट सिटी द्वारे प्रत्येक झोन अंतर्गत उभारण्यात आलेल्या आर आर आर केंद्राची माहिती नागरिकांना उपलब्ध करण्यात येईल. तिथे जाऊन नागरिक जुनी गृहउपयोगी वस्तू जमा करू शकता. यासाठी मनपा शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या व इतर नागरिक गटांचा सहभाग घेणार आहे. या आर आर आर केंद्रांवर बचत गट महिला किंवा स्वच्छता विभागाबरोबर काम करत असल्या महाविद्यालयीन छात्र उपलब्ध असतील.

5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका कार्यक्रमात उत्कृष्ट आर आर आर के केंद्रांना बक्षीस दिले जाणार आहे. मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव ह्यांनी सर्व वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक ह्यांची बैठक घेऊन सर्वांना उत्कृष्ट आर आर आर केंद्र स्थापित करण्याचे निर्देश दिले.

Back to top button
error: Content is protected !!