छत्रपती संभाजीनगर
Trending

जिवाची बाजी लावून पोलिसांनी आटोक्यात आणला किराडपुऱ्यातील राडा, १६ पोलिस गंभीर जखमी ! जाळपोळ दगडफेकीत अडीच कोटींचे नुकसान, 500 समाजकंटकांवर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – जिवाची बाजी लावून पोलिसांनी किराडपुऱ्यातील राडा आटोक्यात आणला. राममंदिर किराडपुरा येथे मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन वेगवेगळ्या समाजातील लोक समोरा-समोर आले. त्यानंतर हिंसक जमावाने दगडफेक, जाळपोळ, लाठ्या-काठ्या घेऊन चढवलेला हल्ला पोलिसांनी जिवाजी बाजी लावून आटोक्यात आणला. हिंसक जमावाला आटोक्यात आणन्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला माईकमधून सूचना दिल्या. त्यानंतर आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याऊपरही जमाव अधिक हिंसक झाल्याने पोलिसांना हवेत फायरींग करावी लागली. सुरुवातीला जिन्सी पोलिसांनी घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात आणन्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शहरभरातील तगडे पोलिस बळ दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. या सर्व राड्यात १६ पोलिस गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या गाड्या आणि शासकीय मालमत्ता असे सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी 500 समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या किराडपुरा परिसरातील परिस्थिती पूर्णतहा नियंत्रणात आणि सर्वसामान्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. सोशल मीडियावर अफवा पसरणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिस निरीक्षक अशोक रामलु भंडारे (पोलिस स्टेशन जिन्सी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिनांक 29/03/2023 रोजी सायंकाळी रात्र हजेरी घेऊन दैनंदिन डयुटी वाटप तसेच रामनवमी बंदोबस्त व रमजान सणाचे अनुषंगाने योग्य सूचना देऊन पोलिसांना रवाना केले होते. दिनांक 30/03/2023 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक रामलु भंडारे निवासस्थानी असताना नाईट डि. ओ. अधिकारी श्रेणी पो.उप.नि. मोहम्मद अनिस यांनी मोबाईल फोनव्दारे माहिती दिली की, राममंदिर किराडपुरा येथे मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन वेगवेगळ्या समाजातील लोक समोरा-समोर आले आहे.

तणाव आहे. यावरून पोलिस निरीक्षक अशोक रामलु भंडारे हे स्वतःच्या वाहनाने मदनी चौक येथे रात्री 01.30 वाजेेच्या सुमारास पोहोचले व तेथून पिटर मोबाईलने राममंदिर येथे पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी पाहिले की राममंदिरा समोरील जाणा-या रस्त्यावर मोठा जमाव जमलेला आहे. त्या जमावामधील दोन्ही बाजुच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. किराडपुरा येथील राममंदिरा समोर रोशनगेटकडे जाणार्या रस्त्यावर, आझाद चौकाकडे जाणार्या रस्त्यावर व रहेमानिया कलनीकडे जाणार्या रस्त्यावर प्रत्येकी 200 ते 250 मिळून जवळपास 500/600 लोकांचा बेकायदेशीर जमाव जमलेला होता. तिन्ही बाजुने राममंदिरावर व पोलीसांवर दगडफेक व वाहनावर त्यांच्याजवळील लाठया, काठ्या व लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड व जाळपोळ सुरू केली.

जमावातील लोक धर्म विशिष्ट घोषणा देत होते. दरम्यान सदर ठिकाणी नाईट डि. ओ. श्रेणी पो.उप.नि. मोहम्मद अनिस, चालक पो.अं. वाघचौरे, आर.टि.पी.सी. पो. अं. कहाटे, II- मोबाईलचे सफौ यावर पठाण, चालक पोह शेख नजिर राममंदिर फिक्स पईन्टचे सफौ कुतुर, पोह डकले, पोह गोराडे, पोना गायकवाड, डायल 112 बिट मार्शलचे पोह शेख फईम, पोना इसाक धांडे आदी पोलिस कर्मचारी यांच्यासह पोलिस निरीक्षक अशोक रामलु भंडारे यांनी जमावास जिन्सी पिटर मोबाईलचे पी. ए. सिस्टीम वरून सूचना देऊन आम्ही जमावास शांत करण्याचा व पांगविण्याचा बराच वेळ प्रयत्न करून सुध्दा जमावातील लोक ऐकत नव्हते.

सदर बेकायदेशीर जमावाबाबत वरिष्ठांना माहिती देऊन अधिकचा फोर्स पाठवणे बाबत विनंती केली. दरम्यान राममंदिरा समोरील तात्पुरते स्वरूपात उभारलेली रामनवमी जन्मोत्सव स्वागत कमानीच्या दिशेने रात्री 2.00 वाजेच्या सुमारास जमावाने दगडफेक सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी शासकीय वाहनाचे पी.ए. सिस्टम वरून वारंवार व सतत बेकायदेशिर जमावाला कायदा हातात न घेणे बाबत व निघून जाण्या बाबत सूचित करत होते. परंतु पोलिसांच्या सूचना व आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देता जमावाने जन्मोत्सव स्वागत कमान पेटवून दिली. त्यानंतर घटनास्थळावरील पोलिसांनी याची माहिती तातडीने नियंत्रण कक्षास दिली.

दरम्यान घटनास्थळावरील पोलिसांच्या मदतीसाठी पोलीस आयुक्तालयातील उस्मानपुरा पो.स्टे. च्या पो.नि.गिता बागवडे, पो.नि. सलगरकर व इतर पो.स्टे. चे विभागीय गस्तीवरील पेट्रोलिंग वाहने, आर.सी.पी. पथक व नियंत्रण कक्ष येथील कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचले. बहुतांश शासकीय वाहनांचे पी. ए. सिस्टम तसेच पोर्टेबल माईक वरून पोलिस जमलेल्या जमावाला घटनास्थळावरून निघून जाण्याच्या सूचना देत होते. परंतू जमाव पांगत नव्हता व हातातील लाठया, काठया व लोखंडी सळया उंचावून नारेबाजी करतच होते.

जमावातील लोकांच्या विघातक कृतीमुळे सार्वजनिक मालमत्ता, मंदिरात व मंदिरा जवळ असलेले सामान्य नागरीक यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे त्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून फौजदारी कलम प्रक्रिया कलम 129 प्रमाणे प्राप्त अधिकारांचा वापर करून बेकायदेशिर जमावास आटोक्यात आणण्यासाठी व राममंदिरा समोरील जाळपोळ रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी असलेले आर.सी.पी.पथकातील अंमलदाराकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही जमावातील लोक निघून न जाता अधिक उग्र होऊन दगडफेक करत पोलिसांच्या दिशेने धावून आले.

दरम्यान सदर बेकायदेशिर जमाव हा जास्त हिंसक होऊन पोलिसांवर जिवघेणा हल्ला करत असल्यामुळे आर. सी. पी. चे अंमलदार यांचे कडील डमी राऊंड /प्लास्टिक राऊंड फायर केले तरीही जमाव नियंत्रणात आला नाही याऊलट पोलिसांची सरकारी वाहने पेटवून द्यायला सुरूवात केली. बेकायदेशिर जमावाने तुफान दगडफेक करत शासकीय वाहने पेटवून देण्यास सुरुवात केली तसेच राममंदिराकडे दोन्ही गेटने घुसून बंदोबस्तातील अधिकारी व उत्सवा करता जमलेले नागरिक व कर्मचा-यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाठया, काठया, सळाया आदी प्राणघातक हत्यारासह हल्ला केला.

इनको निकालो जलाकर मार डालो, आज किसीको जिंदा नहि छोडेंगे, अशा घोषणा देऊ लागले. राममंदिराचे मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली म्हणून घटनास्थळावरील पोलिस पथकाने व सोबतच्या पो.नि. गिता बागवडे यांनी सदरील आक्रमक झालेल्या जमावाच्या उपयुक्त दिशेने सर्विस पिस्टल मधून अनुक्रमे पाच व सहा जिवंत राऊंड निलींग पोजीशनमध्ये फायर केले. बेकायदेशिर जमावाचे समोरील भागात 20 ते 25 लोक होते. बेकायदेशिर जमावातील अनेकांना पोलिसांनी स्वत: व अनेकांना सोबतचे अंमलदार ओळखतात व अन्य इतरांना पाहिल्यास ओळख पटू शकते.

दरम्यान तेथे घटनास्थळावरील पोलिसांच्या मदतीसाठी पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – 1 व 2 तसेच मुख्यालय हे घटनास्थळी पोहोचले होते. बेकायदेशीर जमावाने केलेल्या जिवघेण्या हल्लामध्ये पोलिस निरीक्षक अशोक रामलु भंडारे हे स्वतः तसेच 1) पोलीस उप आयुक्त, मुख्यालय 2) सपोआ, निशीकांत भुजबळ 3) पो. नि. अविनाश आघाव ने. गुन्हेशाखा, 4) पोलीस निरीक्षक गिता बागवडे ने पो.स्टे. उस्मानपुरा 5) सपोनि सुनिल क-हाळे पो.स्टे. सिटीचौक 6) सफौ यावर पठाण 7) सफौ कुतुर 8) पोहेक सय्यद फहिम 9) पोना इसाक धांडे, अ. क्र. 6 ते 9 सर्व .पो.स्टे. जिन्सी 10 ) पो. अं. श्याम पवार 11) अंकुश दांडगे ने. पो.स्टे. सिटीचौक 12 ) पो.अं. दीपक हिवाळे ने. सिडको आर.सी.पी. 13) पो. अं. शाम साळवे ने सिटी आर. सी. पी. 14) पोना प्रमोद ब-हाटे ने पो.स्टे. उस्मानपुरा 15) पोह एजाज अहेमद ने नियंत्रण कक्ष आर. सी. पथक 16) दीपक शालीक गडवे पो. अं. ने सिडको आर.सी.पी.पथक व इतर अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले.

बेकायदेशीर जमावातील लोकांनी पेटवून दिलेल्या व नुकसान केलेल्या वाहनांची यादी खालील प्रमाणे आहे 1) पो.स्टे. जिन्सी सुमो गोल्डो जी गाडी क्र.MH-12-PQ-3709,2) सपोआ सिडको विभाग यांचे शासकीय वाहन इर्टिगा जिप क्र. MH-20-EE- 5204,3) जिन्सी II-मोबाईल क्र. MH-20-CU-0073,4) पो.स्टे. उस्मानपुरा गाडी क्र.MH-12-PQ-3706.5) पो.स्टे. दौलताबाद गाडी क्र. MH-12-PT-7757, 6) पो.स्टे. हर्सूल पिटर मोबाईल क्र. MH-20-CU-3707,7) पो.स्टे. सिटीचौक पिटर मोबाईल क्र. MH-12-RY- 7435 महिन्द्रा TUV कंपनीची, 8) पो.स्टे. एम. सिडको गाडी क्र. MH-20-EE-4626 सुमो गोल्ड कंपनीची व 9) आर.सी.पी. सिडको फायटनर गाडी क्र. MH-20 -AS-5719 टाटा कंपनीची, 10) आर. सी.पी. सिटीचौक फायटनर गाडी क्र. MH-20-CU- 011411) मोटार परीवहन विभाग येथील वाहन MH-12- PT-7764 महिन्द्रा बोलेरो 12 ) मोटार परीवहन विभाग येथील वाहन MH-12 PT 7780 महिन्द्रा बोलेरो 13) पोशि/3193 शहेबाज खान आर. सी. पी. कर्मचारी खाजगी वाहने MH-20 EQ 1390 यामाहा FZ कंपनीची 14 ) तसेच मपोअं माया सोनवणे आर.सी.पी. सिडको यांची गाडी ऍक्टिव्हा क्र. MH-20-1123 असे वरील वाहने पेटवून दिली. सदर वाहनावरील पी. ए. सिस्टम, जि. पी. एस. सिस्टम, वायरलेस संच, वाहनांचे लॉकबुक व इतर साहित्य संपूर्णपणे जाळून अंदाजे अडीच कोटी रू. चे नुकसान केले आहे. याप्रकणी जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!