जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 09 -: सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठीची कामे तत्परतेने पूर्ण करत प्रक्रिया गतिमानतेने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी आ. आंबादास दानवे, सिल्लोड उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी यांनी स्मारकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि अभ्यासक, पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने करण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आ. दानवे, उपाध्यक्ष सत्तार यांच्यासह समिती सदस्यांनी यावेळी स्मारक निर्मितीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here