ADS 2

औरंगाबाद, दि. 5 – चिकलठाणा पोलीसांनी घरगुती सिलेंडच्या होणाऱ्या काळ्या बाजरावर छापा मारून १९३ घरगुती सिलेंडर सह ६२५५५० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अरोपीस न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपीताना दि. ०६/०९/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावला आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ०४/०९/२०२१ रोजी पोलीस स्टेशन चिकलठाणा हद्दीत मौजे गेवराई तांडा (ता.जि.औरंगाबाद) येथील सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अॅटो एलपीजी रिक्षात इंधन म्हणून वापर करत असल्याबाबत सपोनि गजानन जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली. या ठिकाणी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोस्टे चिकलठाणा येथील पथाकाने गेवराई तांडा शिवारातील बंद पडलेली वर्धमान ऑईल मिलमध्ये जाऊन छापा मारला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सदर ठिकाणी विकास नारायण गटकाळ (रा. पंढरपूर) हा ईलेक्ट्रीक मोटारीच्या साहाय्याने अॅटोरिक्षा मध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस भरत असताना मिळुन आला. सदर ठिकाणी दोन रिक्षांसह त्याचे चालक १) राजु रतन नरवडे (रा. बिडकीन, ता. पैठण), २) शिवाजी सुखदेव खरात (रा. चित्तेगाव, ता. पैठण) हे मिळून आले. या ठिकाणी घरगुती वापराचे लहान व मोठे असे १८० सिलेंडर, वजन काटे, ईलेक्ट्रीक मोटार, गॅस रिफीलींग करण्यासठी लागणारे इंजन आदी साहित्य मिळून आले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

गॅस भरणारा विकास यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर व्यवसायाचा मालक शेख लतिफ शेख मुसा (रा. सादात नगर औरंगाबाद) सदर ठिकाणी तहसीलदार पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. शेख लतिफ यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यास मिळालेले गॅस सिलेंडर कोठून आणतो या बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी गजानन गायकवाड (रा. पंढरपूर) यांच्याकडून सदर सिलेंडर घेत असतो.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावरून पोलीस पथकाने गजानन मच्छिद्र गायकवाड यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील एकूण १३ सिलेंडर जप्त केले. असा एकूण ६२५५५० / – रुपयांचा माल मिळून आल्याने त्यांच्यावर पोस्टे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोपीस न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपीतांना दि. ०६/०९/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झालेला आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी औ.बाद ग्रा. डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चिकलठाणा येथील सपोनि गजानन जाधव, पोउपनि प्रदीप ठुबे, पोलीस हवालदार संपत राठोड, पोलीस नाईक दीपक देशमुख, पोलीस अंमलदार दीपक सुरोशे, आण्णा गावंडे, छाया नगराळे, सुरेखा सौंदरमल यांनी केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा