छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

इयत्ता 11 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीमेचे आयोजन ! फी माफीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने राज्यामध्ये सामाजिक न्याय पर्व अभियान दि.01 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त कार्यरत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यतील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेतंर्गत शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थांकरीता शेवटची संधी म्हणून दि.01 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करुन घेणे व अशा विद्यार्थ्यांपैकी परिपूर्ण प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देणे याकरीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अशा सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने जात प्रमाणत्र पडताळणीचे अर्ज भरुन सदर अर्जाची हार्ड कॉपी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात सादर करावीत. तसेच जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023 – 2024 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यानाही सदर कालावधीत त्यांचे जात प्रमाणपत्र पड:ताळणीचे अर्ज समिती कार्यालयास दाखल करता येतील.

इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी तसेच फी माफीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समिती कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!