क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी !

0
जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी !

मुंबई -: प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक असून, यासंदर्भात कुलकर्णी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला.

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिले. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here