ADS 2

औरंगाबाद, दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. गुरुवारपासून (दि.२९) पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘कोविड‘च्या पार्श्वभूमीवर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर विद्यार्थ्यांना पेपर देता येणार आहेत. परीक्षा व मुल्यमापन मंडळाची नुकतीच बैठक होऊन परीक्षेचे नियोजन करण्यात आले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानूसार २९ जुलैपासून बीए, बीएस्सी व बीकॉम द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरु होणार आहेत. २३ ते २८ जुलै या काळात ‘मॉक टेस्ट‘ घेण्यात आली. पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा देणाऱ्या ८७ हजार १०२ विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली. १० ऑगस्ट पासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून घेण्यात येतील. तर अभियांत्रिकी फार्मसी, विधीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शासन आदेशप्रमाणे नियोजन – कुलगुरु
पदवी व पदव्युत्तर अभ्यासकमाच्या मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. निकालही वेळेवर लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश आले. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पुढील सत्राचे नियोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा