जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

जालना : – कापूस विकण्याच्या कारणावरून चुलत्याच्या खून प्रकरणात पुतन्याला दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश -६ जालना पी.पी. कुलकर्णी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

युनुस पठाण असे मृताचे नाव असून मासुम दादामिया पठाण (२८, रा. बाबुळगांव, ता. भोकरदन, जि. जालना) असे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनांक ३१/०५/२०२१ रोजी न्यायालयाने मासुम दादामिया पठाण यांना कलम ३०४ (२) भादवि मध्ये पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०१/०२/२०१९ रोजी संध्याकाळी ०७:३० वाजता या प्रकरणातील आरोपी मासुम दादामिया पठाण हा युनुस पठाण यांच्या घरी आला. कापूस विकण्याच्या कारणावरुन त्यांचेमध्ये भांडण झाले. त्यानंतर युनुस पठाण पुढे गेला असता मासुम दादामिया पठाण याने तुझे तीन तुकडे करतो असे म्हणून तो त्यांचे घरी गेला व त्यावेळेस युनुस पठाण हा त्याच्या भीतीमुळे प्रार्थनास्थळमध्ये नमाज पडण्यासाठी गेला. मासुम दादामिया पठाण हा चाकु घेवून आला व शिवीगाळ करत तो प्रार्थनास्थलासमोर उभा राहिला. त्यानंतर युनुस पठाण प्रार्थनास्थळामधून बाहेर आला. त्यावेळेस त्याचे सोबत त्याचा लहान मुलगा अन्वरखाँ होता. त्याच्या समोर मासुम दादामिया पठाण याने युनुस पठाण यांच्या पोटात चाकू खूपसला. जखमी युनुस पठाण यांना भोकरदन येथील हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, जखम गंभीर असल्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे घेवून जात असताना रस्त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत मृताच्या मुलाने पोलीस ठाणे भोकरदन येथे त्याच दिवशी घटनेची फिर्यादी दिली. पोलीस ठाणे भोकरदन येथे नोंदवलेल्या घटनेचा तपास करून आरोपी विरुध्द दाखल झालेला गुन्हा क्र. ३५ /२०१९ कलम ३०२, भादवि नुसार न्यायालयात दोषरोपपत्र पाठविण्यात आले. सरकार पक्षाचे वतीने एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मृताचा मुलगा व प्रत्येक्षदर्शी साक्षीदार मृताचा लहान मुलगा, तसेच दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मेडीकल अधिकारी भोकरदन व पंचसाक्षीदार व तपासीक अमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश –६ जालना पी.पी. कुलकर्णी यांनी मासुम दादामिया पठाण यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

या प्रकरणात जालना सरकारी वकील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कोर्ट पैरवी यांनी मदत केली. सरकार पक्षाचे वतीने सहा. सरकारी वकील बी.के.खांडेकर यांनी पाहिले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here