ADS 2

औरंगाबाद, दि. 19 – पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश केला आहे. फसवणुक करणान्या टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून ३,१०,४५५ / – रुपये रोख रक्कम व ५ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,२४,४५५/- रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील दोन आरोपी जालना शहरातील असून तिसरा आरोपी सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी पोलिसांच्या ताब्यात आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक ०५/०६/२०२१ रोजी राजु बाबुलाल शिंदे (व्यवसाय – व्यापार, रा. पाल ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे सिल्लोड शहर येथे फिर्याद दिली. या फिर्यादीत नमूद केले की, मागील एक महिन्यापूर्वी माझे औरंगाबाद ते जळगांव रोडवरील पाल फाटा येथील दुकानावर १) काळे पाटील (पूर्ण नाव माहित नाही मो.नं ९७६४०३८८०५ रा. कोपरगांव, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर), २) सुनील (पूर्ण नांव माहित नाही. मो. नं. ९३२६९६१३१५ रा. कोपरगांव, जि. अहमदनगर) असे आले. तेव्हा ते मला म्हणाले की, आम्ही कोपरगांव येथून आलो आहोत. तुम्हाला आम्ही दहा लाखाचे वीस लाख करून देतो. आमच्याकडे पैसे खुप पडलेले आहेत. आम्हाला नोटा फक्त अदला बदल करणे आहे, असे सांगितल्याने माझा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर दोघेही माझ्या दुकानावर चार ते पाच वेळेस आले. मला तुम्हाला आम्ही दहा लाखाचे वीस लाख करून देतो आमच्याकडे पैसे खुप पडलेले आहेत, असे म्हणाले. मागील सात दिवसांच्या पूर्वी माझे दुकानावर काळे पाटील आले ते मला म्हणाले की, तुला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू माझ्या सोबत माझ्या घरी चल असे सांगितल्याने तो मला कोपरगांव येथे घेऊन गेला होता.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तो मला एका बंगल्यामध्ये घेऊन गेला. या ठिकाणी तुला दहा चे वीस लाख रुपये देऊ असे सांगून त्याने माझा विश्वास संपादन केला. मागील चार पाच दिवसांपूर्वी मला काळे पाटील याने औरंगाबाद येथे बोलावले. मला नमुना नोटा म्हणून बाराशे रुपये देऊन म्हणाला की, ह्या नोटा तुम्ही चलनात चालवून पहा. त्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचे ते. काळे पाटील यांनी दिलेल्या नोटा चलनात चालवल्या. त्या ख-या ओरिजनल नोटा होत्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर सुनील याने त्याचे मोबाईल वरून नोटाचे व्हॉटसअॅप व्हिडीओ पाठवले. मला सारखे फोन करून म्हणत होते की, तुम्ही घाबरु नका, तुमची फसवणुक होणार नाही, दहा लाख रुपये तयार करून ठेवा, यापेक्षा कमी पैसे तुम्हांला बदलून मिळणार नाही, असे सांगून त्यांनी माझा विश्वास संपादन केल्याने मी दहा लाख रुपयांची जुळवा-जुळव केली. दिनांक ०३/०६/२०२१ रोजी संध्याकाळी मी काळे पाटील व सुनील यांना दहा लाख रुपये जमा केल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर दिनांक ०४/०६/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास मी माझे घरी असताना काळे पाटील व सुनील यांचा फोन आला व पैसे घेऊन सिल्लोड येथे भोकरदन रोडने येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी भोकरदन नाक्यावर जाऊन थांबलो असता दोन अनोळखी व्यक्ती पैशाची बॅग घेऊन माझ्याकडे आले व मला म्हणाले की, तुमच्याकडील पैसे दाखवा असे म्हणाल्याने मी त्यांना माझ्याकडील पैसे दाखवले. त्यांना मी माझ्या कडील दहा लाख रुपयाची पैशाची पिशवी दिली. त्यांच्याकडील काळ्या रंगाची बॅग माझ्याकडे फेकून म्हणाले की, हे घ्या वीस लाख रुपये, असे म्हणून पळ काढत एका पांढ-या रंगाच्या गाडीत जाऊन बसले व पळून गेले. काळ्या रंगाच्या बॅगमधील पैसे पाहिले असता त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा होत्या. त्यांनी मला लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा देऊन माझी फसवणुक केली. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सिल्लोड शहर येथे गु.र.नं ७९/२०२१ कलम ४२०, ४१७, ४०६, ३४ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, हा गुन्हा (१) शेख हारुण शेख छोटू (२) अस्लम इब्राहिम कुरेशी (दोघे रा. जालना) यांनी त्यांच्या साथीदारांसह केलेला आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींचा जालना शहरात जाऊन शोध घेतला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नांवे (१) शेख हारुण शेन छोटू (३८, रा. दुखी नगर, जुना जालना), (२) अस्लम इब्राहिम कुरेशी (४६, रा. आनंद नगर, नूतन वसाहत, जालना) असे सांगून नमुद आरोपींकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार (३) शेख भिकन शेख मिठू (रा. बोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) व आणखी एका साथीदारासोबत केला असल्याची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपींच्या ताब्यातून ३,१०,४५५ / – रुपये रोख रक्कम व ५ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,२४,४५५/- रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. यातील निष्पन्न आरोपी शेख भिकन शेख मिठू यास उस्मानाबाद जिल्हयातील पोलीस ठाणे बेंबळी गु.र.नं ६७/२०२१ कलम ४२० भा.दं.वि च्या गुन्हयात अटक केलेली आहे. नमुद आरोपी सध्या वरिल गुन्ह्याच्या तपासात दिनांक २१/०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडीत आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोउपनि संदीप सोळंके, गणेश राऊत, पोह नामदेव सिरसाठ, संजय काळे, प्रमोद खांडेभराड, विक्रम देशमुख, बालू पाथ्रीकर, किरण गोरे, पोना वाल्मीक निकम, राहूल पगारे, शेख नदीम, संजय भोसले, पोकॉ ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, चालक पोकॉ संजय तांदळे, संतोष डमाळे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा