फाईल फोटो
ADS 2

मुंबई, दि. 06 –: अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नारायण गड येथील विविध विकास कामांना निधी मिळवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आमदार महोदयांच्या समवेत याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत विनंती केली होती.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत ही बैठक उद्या दुपारी मंत्रालयात होणार असून या बैठकीत तीनही गडांच्या विकासासाठी आवश्यक निधीचा प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. विनायक मेटे यांसह संबंधित विभागांचे सचिव स्तरावरील अधिकारी व त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील श्री क्षेत्र भगवान गड, बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नारायणगड या तीनही गडांचे धार्मिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्व आहे. या तीनही गडांवर श्रद्धा असलेले लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. या ठिकाणी विविध विकासकामे व पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी भरीव निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार उद्याच्या बैठकीत निधीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा