ADS 2

औरंगाबाद, दि 18 – कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासन निर्देशानुसार गणपती विसर्जन ठिकाणी गर्दी होऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील 9 झोन मध्ये एकूण 40 मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी 40 पथके व वाहने कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांना श्री गणेश विसर्जन उत्साहात व कोविड नियमांचे पालन करून साजरे करता येईल.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अशी आहेत झोन निहाय श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र
झोन 1-
खडकेश्वर महादेव मंदिराजवळ, माजी नगरसेवक पांडे यांच्या घराजवळ बेगमपुरा, संत विश्राम बाबा शाळेजवळ नंदनवन कॉलनी, वाणी कॉम्प्लेक्स जवळ पडेगाव, गांधी पुतळ्या जवळ.

झोन 2- शहागंज चमन, गुलमंडी पार्किंग, सावरकर चौक, समर्थनगर.
झोन 3- साखरे मंगल कार्यालय समोर, पोलीस कॉलनी सभागृह जवळ.
झोन 4- शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल जेल समोर जाटवाडा रोड,स्मृतिवन गार्डन जवळ हर्सूल तलाव, एसबीओ शाळेजवळ मयुर पार्क.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

झोन 5- रामलीला मैदान एन 7,राजीव गांधी मैदान एन 5, चिकलठाणा आठवडी बाजार, गरवारे स्टेडियम.
झोन 6- मुकुंदवाडी बस स्टॉप, कामगार चौक एन 2, डॉ आंबेडकर चौक चिकलठाणा, रामनगर चौक एन 2 सिडको.
झोन 7- कॅनॉट गार्डन परिसर टाऊन सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा, विजयनगर चौक, सूतगिरणी चौक, विसर्जन विहीर शिवाजी नगर, हनुमान चौक, हनुमान नगर पाणी टाकी जवळ, रिद्धी सिद्धी हॉल समोर उल्का नगरी.

झोन 8- 106 कंचनवाडी/नक्षत्रवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, 110 मयूरबन कॉलनी, जबिंदा लॉन्स जवळ, 114 देवलाई चौक देवळाई, 114,115 देवळाई सातारा, रेणुकामाता मंदिर कमान, 115 सातारा, सातारा मुख्य गाव विसर्जन विहीर.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

झोन 9- ज्योतिनगर अंतर्गत पाण्याच्या टाकी जवळ, क्रांती चौक अंतर्गत संत एकनाथ रंग मंदिर, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन मुख्य रस्ता कर्णपुरा.
वरील 40 संकलन केंद्रावर श्री गणपती मूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून महानगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

ADS 4