जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 31 – पोलीस ठाणे पिशोर व करमाड हद्यीत ट्रक्टर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद आली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन ट्रक्टर हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. वडोदबाजार, उमरावती, नरला, खंडाळा, देवगांव रंगारीती येथील 6 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २७/०५/२०२१ रोजी एतेशाम नासेर काजी (२८, रा. नागापूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केले की, दिनांक २६/०५/२०२१ रोजी २२:०० ते दिनांक २७/०५/२०२१ रोजी ०६:०० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे केलेले ट्रक्टर (एम.एच २० – एफ.पी -२१६५) व त्याला जोडलेली लोखंडी ट्रॉली असे एकूण ७,००,००० / – रुपये किंमतीचे अज्ञात चोरटयाने चोरून नेले. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे पिशोर येथे गु.र.नं. १३४/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच दिनांक १७/०५/२०२१ रोजी रफीक गफूर बागवान (रा. लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे करमाड येथे फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, दिनांक १४/०५/२०२१ रोजीचे ०८:०० ते दिनांक १५/०५/२०२१ चे दरम्यान अज्ञात चोरटयाने त्यांच्या शेतातून पॉवर टेक कंपनीचे ट्रक्टर (एम.एच – २० – ए.बी. – ९९९०) अज्ञात चोरटयाने चोरून नेले. या तक्रारीवरून पोलीस ठाणे करमाड येथे गु.र.नं. १९७/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अशी फिरली तपासाची चक्रे- या गुन्हयांची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली. या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचे गुन्हे हे (१) शेख समीर उर्फ दादा शेख रज्जाक (२८, रा. वडोदबाजार, ता. फुलंबी) याने चोरला असून तो त्यांची परस्पर विक्री करण्याच्या तयारीत आहे. ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेतला. तो मिळून आल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार (२) अमोल भाऊसाहेब खमाट (२५, रा. उमरावती, ता. फुलंब्री), (३) ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या विष्णू धांडे (२४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) असे तिघांनी मिळून केला आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच पंधरा दिवसांपूर्वी लाडसावंगी गावातून त्याचा साथीदार (४) गजानन शंकर तुपे (३६, रा. नरला, ता. फुलंब्री) याच्या सोबत एक पॉवरट्रक कंपनीचे ट्रक्टर ट्रालीसह चोरले असून सदरचे दोन्ही ट्रक्टर हे माझ्या ओळखीचे (५) समीर नशीर पठाण (३६, रा. खंडाळा, ता. वैजापूर), (६) कलीम बेग सलीम बेग (४८, रा. देवगांव रंगारी, ता.कन्नड) यांच्याकडे विक्री साठी दिले आहेत, अशी माहिती दिली. आरोपीतांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून १२,८०,००० / – रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रालीसह जप्त करण्यात आले आहेत. आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे पिशोर व करमाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी बजावली कामगीरी- ही कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उप निरिक्षक गणेश राऊत, पोहेकॉ संजय काळे, बालू पाथ्रीकर, विक्रम देशमुख, नामदेव सिरसाठ, पोना शेख नदीम, वाल्मीक निकम, पोकॉ बाबासाहेब नवले, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here