जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 11 -: कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद होते. आर्थिक घडी विस्कटली आहे. व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. व्यवसाय नसल्याने त्यांना थकीत वीजबिल भरता आलेले नाही. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून वीजबिल माफीची मागणी होत आहे. यावर काही निर्णय घेणार आहात का? असा प्रश्न उपस्थित होत असताना, वीजबिल माफी देणे अशक्य आहे. ते वीज कंपनीचे काम नसून, केंद्र आणि राज्य सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने वीजमाफीबाबत निर्णय घेतल्यास त्यासाठी राज्य सरकार आपली भूमिका पार पाडील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली. महावितरण प्रादेशिक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री राऊत बोलत होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

राज्यात २०२५ पर्यंत २५ हजार मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापैकी १७ हजार मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल व उद्योग, व्यवसायाला गती मिळणार असल्याची माहितीही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना काळात आम्ही अत्यंत प्रभावीपणे वीज वितरण, पारेषण व निर्मिती यामध्ये समन्वय साधून राज्यातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा दिला. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्री वादळग्रस्त कोकण, पुणे,नाशिक व अहमदनगर परिसरात जमीनदोस्त झालेल्या वीज यंत्रणेचे अल्पावधीतच विक्रमी वेळेत उभारणी व पायाभूत सुविधांची निर्मिती केली. याशिवाय मे 2021 मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळात कोकण किनारपट्टीतील गावांचे नुकसान झाले. हजारो गावांचा खंडित वीज पुरवठा विक्रमी वेळेत आम्ही सुरू केला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कोवीड काळात एकरकमी वीज बिल भरलेल्या घरगुती वीजग्राहकांना 2 टक्के सुट, वीज बील भरण्यासाठी 3 हप्त्यांचा पर्याय, स्थिर आकार उशिरा भरण्याची सवलत देण्यासह वीज बिल थकल्याबद्दल कोणाचीही वीज जोडणी कापण्यात आली नाही. वाढीव वीज बिलाच्या तक्रारी वेळेत सोडविण्यासाठी वीज वितरण कंपन्यांना निर्देश दिले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या संसाधनामध्ये झपाट्याने घट होत आहे. यामुळे वीज निर्मितीसाठी सरकारने नवीन धोरण ठरविले असून, त्यानुसार जूने प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आणि राज्यात यापुढे नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्या ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प प्रभावीपणे राबवून वीज निर्मितीवर भर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला आहे. विशेषत: दुर्गम, वाड्या, वस्त्या, पाड्यावर वीज पोहोचवण्याचे आव्हान पेलण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु केले जाणार आहेत. यामुळे विभागात रोजगार मिळणार असून, उद्योग-व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे मुदवाढ सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रथम १७ हजार मेगा वॅट सौर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लॉकडाऊनमुळे या प्रकल्पासाठी आवश्यक ते कामे वेळेत पूर्ण करता आलेली नाहीत. कोरोनाच्या दोन लाटेमुळे त्या प्रकल्पासाठी करावे लागणारे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बिडकीन येथे उपविभाग सुरु करण्याबाबत मागणी आली आहे, त्याबाबत विचार सुरु असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

पदोन्नतीतील आरक्षण संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या संदर्भात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सरकारचे धोरण शेतकऱ्यासाठीच आहे. त्यांच्यासाठी सौर ऊर्जा योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगासाठी सबसिडी बंद करण्यात आलेली नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, सबसिडी उद्योजकांना मदत करण्यासाठी नव्हे तर उद्योगवाढीसाठी होती. एक महिन्याचा सबसिडीसाठी निधी देणे बाकी आहे. मात्र आमच्याकडे सबसिडी एकाच जिल्ह्याकडे दिली जाते, अशा आशयाचा तक्रारी आल्या होत्या. त्या नुसार तपासणीचे काम आमच्या विभागकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here