जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

मुंबई, दि. 1 : नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील शासकीय इमारतींच्या कामांना गती मिळणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर अंतर्गत मोठ्या प्रमाणावर इमारतीची कामे मंजूर आहेत. मात्र या कामाच्या वास्तुविशारदीय कामांसाठी औरंगाबाद स्थित कार्यालयात जावे लागते. तसेच इमारतीच्या या कामांवर वास्तुविशारदीय दृष्टीकोनातून कार्यान्वयन करणे जिकीरीचे होत आहे.

तसेच किनवट, माहूर, हदगांव, भोकर यांसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील अधिकाऱ्यांना औरंगाबाद येथे वास्तुविशारदीय दृष्टीकोनातून पाठपुरावा करणे नेहमी जिकीरीचे होत आहे. तसेच, सद्य:स्थितीत नांदेड येथे इमारतीच्या कामांचा ओघ पाहून वरिष्ठ वास्तू शास्त्रज्ञ कार्यालय स्थापन करण्यासाठी श्री. चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील वास्तुशास्त्र विभागासाठी मंजूर पदापैकी नांदेड येथे होणाऱ्या या कार्यालयात 1 वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 1 वास्तुशास्त्रज्ञ, 1 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 1 सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अशी चार पदे असणार आहेत. याशिवाय अतांत्रिक पदेही असणार आहेत.

नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्याचे कामकाज या नव्या कार्यालयातून होणार आहे. या कार्यालय उप मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, औरंगाबाद यांचे पर्यवेक्षीय नियंत्रणाखाली राहणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here