ADS 2

औरंगाबाद, दि. 30 -: कोविड-19संसर्गसाखळी (Levels of Restrictions for Safe Maharashtra) तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 28 जून रोजी सविस्तर आदेश निर्गमित केलेले आहेत. या आदेशातील काही बाबींमध्ये सुधारणा (Clarification) निर्गमित करण्यात येत असून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

1.लग्न समारंभ – तिथीनुसार पूर्व नियोजित साखरपुडा/हळदी/लग्न इ. समारंभ कार्यक्रम असल्याने त्यासाठी Weekly lockdown (शनिवार व रविवार) च्या निर्बधाबाबत शिथिलता देण्यात येत आहे. याशिवाय इतर समारंभ/ कार्यक्रमासाठी शनिवार व रविवारी ग्राहक/पाहूणे/ हॉटेल मंगल कार्यालयात आल्यास दंडात्मक/सिलिंगची कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

2. मॉल – Food court , आसन व्यवस्थेसह असलेले खाद्यगृह, इत्यादी ठिकाणी केवळ Home delivery (घरपोच) पार्सल सुविधा रात्री 08.00वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहिल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

3. पर्यटन स्थळे- बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी व दौलताबाद किल्ला
• सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 4.00 वाजेपावेतो चालू ठेवण्यास मुभा राहिल.
• (दुपारी 4.00 वाजता उपस्थित पर्यंटकांची पर्यटनस्थळावरून बाहेर पडणे Exit होण अनिवार्य.)
• सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई (No Movement Outside Bubble)
• सकाळच्या सत्रात (First Half ) 500 पर्यटक
• दुपारच्या सत्रात (Second Half) 500 पर्यटकांना अनुमती

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

4. घरगुती गॅस सिंलेडंर पुरवठा • फक्त सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
1)मास्क वापरणे 2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य राहिल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा