ADS 2

औरंगाबाद, दि. 13 – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपाचाची चक्र फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात औरंगाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 13/09/2021 रोजी पोलीस ठाणे सातारा येथे फिर्यादी दिंगबर दत्ता काकडे (रा. ह.मु. नक्षत्रपार्क, नक्षत्रवाडी, औरंगाबाद, मुळ रा. हदगाव जि. नांदेड) यांनी पोलीस ठाणे सातारा येथे फिर्याद दिली की, दिनांक 12/09/2021 रोजी दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा महेश दिगंबर काकडे (18) व त्याचा मित्र राहुल असे कांचनवाडी येथे एका बिल्डींगमध्ये दारु पित बसलेले होते. तेथे महेश याचा मित्र विकास रहाटवार (रा. कांचनवाडी, औरंगाबाद) हा अगोदरपासुन दारू पित बसलेला होता. थोड्या वेळात त्या ठिकाणी विकास याचा मित्र संदीप उर्फ गुज्जर मुळेकर हा तेथे आला चौघे सोबत दारू पिले. त्यानंतर विकास याने महेश यास दारु आणण्यासाठी पैसे मागितले असता महेश याने पैसे देण्यास नकार दिला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे विकास व संदीप या दोघांना महेश याचा राग आला. विकास याने महेशचे केस धरून त्याचे डोके स्लॅपवर आदळले व संदीप याने विटाने महेशच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले, तसेच महेशचा मित्र राहुल हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यास देखील दोघांनी लाथाबुक्याने मारहाण करुन संदीप याने राहुल याच्या डोक्यात विटाने मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. त्यावरुन पो. ठाणे सातारा येथे गु.रजि.नं. 439/2021 भा.दं.वि. कलम 302, 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना गुन्हेशाखेस गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त झाली की, गुन्हयातील आरोपी 1) विकास राहाटवाड, 2) संदीप उर्फ गुज्जर मुळेकर (दोघे रा. कांचनवाडी, औरंगाबाद) हे कांचनवाडी येथे आलेले आहेत. मिळालेल्या माहीतीवरून आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या तपासकामी पो. ठाणे सातारा येथे हजर केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), रविंद्र सालोखे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव गुन्हेशाखा, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नंदकुमार भंडारे, पोलीस अंमलदार किरण गांवडे, संजयसिंह राजपुत, धर्मराज गायकवाड, नितिन देशमुख यांनी केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा