कन्नडछत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

कन्नड तालुक्यातील पिशोर उपविभागांतर्गत १६ तर पैठण उपविभागांतर्गत केसापुरी, पैठण खेडा व जैदपूर गावे वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त !

१९ गावे वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ : वीजबिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणकडून प्रभावी प्रयत्न करण्यात येत आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांचाही महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी २६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १९ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत तर ३ गावे थकबाकीमुक्तीच्या मार्गावर आहेत.

कन्नड तालुक्यातील पिशोर उपविभागांतर्गत धामणी, आंबेगाव, शिपघाट, दुधमाळ, मेहुण, सावरगाव, सातकुंड तांडा, चिमणापूर, रेऊळगाव, पळशी खुर्द, देवपुळ, अमदाबाद, डोंगरगाव, टाकळी, मोहरा व मोहाडी ही १६ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. तर पैठण उपविभागांतर्गत केसापुरी, पैठण खेडा व जैदपूर ही ३ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

पैठण तालुक्यातील नानेगाव, पुसेगाव व डेरा या गावातही वीजबिल भरण्यास गावकरी चांगला प्रतिसाद देत असून ३१ मार्चपर्यंत ही गावे थकबाकीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. याकामी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी व जनमित्रांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्यास सर्व वीजग्राहकांनी सहकार्य केले. या सर्वांचे मुख्य अभियंता सचिन तालेवार व अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!