कन्नड
Trending

कन्नड: शिवना टाकळी कालवा उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांना दमदाटी, रस्त्याच्या कामावरून दिली आत्महत्येची धमकी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 27 – कन्नड तालुक्यातील जळगाव घाट ते जैतापूर गट क्र 41 पर्यत बुडीत क्षेत्राच्या मागच्या शेतक-यांना येण्याजाण्यासाठी रस्ता मंजुर झालेला आहे. सदर संपादित जागेवर काम करून घेण्यासाठी पथक गेले असता चौघांनी उपविभागीय अधिकारी व पथकाशी वाद घातला. यावेळी काही जण उपविभागीय अधिकार्यांच्या अंगावरही धावून गेले. त्यांना दमदाटी केली. यासह या रस्त्याचे काम सुरु केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना मौजे जळगाव घाट शिवारात गट क्र 27 मध्ये दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, सदर जागा ही संपादित म्हणजे सरकारीच असून या जागेतूनच केवळ सुमारे ३ गुंठे एवढ्या जागेतून परिसरातील शेतकर्यांच्या रस्त्याचा प्रश्न सुटू शकतो. हे सर्व आम्ही शेतकर्यांच्या हितासाठीच करत आहोत, अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी यांनी संभाजीनगर लाईव्हला दिली.

1) दौलत श्रीपत ठोंबरे 2) दिनकर दौलत ठोंबरे 3) कैलास दौलत ठोंबरे (4) अन्य एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ (वय 54 वर्षे व्यवसाय नौकरी उपविभागीय अधिकारी, शिवना टाकळी, कालवा उपविभाग टाकळी ता कन्नड जि औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, एक वर्षापासून ते नेमणुकीस असून उपविभागीय अधिकारी म्हणुन शिवना टाकळी कालवा येथे उपविभाग टाकळी येथे काम पाहतात. मौजे जळगाव घाट येथील गट क्र 27 संपादित क्षेत्रातील बाहेर जागेवर राहणारे 1) दौलत श्रीपत ठोंबरे 2) दिनकर दौलत ठोंबरे 3) कैलास दौलत ठोंबरे (4) अन्य एक महिला हे राहत असून सदर शासकीय जागेवर अनाधिकृतपणे शेती करतात. मागील वर्षी जळगाव घाट ते जैतापूर गट क्र 41 पर्यत बुडीत क्षेत्राच्या मागच्या शेतक-यांना येण्याजाण्यासाठी रस्ता मंजुर झालेला आहे.

त्यामुळे दि. 27/06/2022 व दि. 28/06/2022 रोजी सदर संपादित जागेची मोजणी करणे असल्याने मोजणीवेळी वरील चौघांनी उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांच्या पथकाला अडथळा आणून मोजणी होवू दिली नव्हती. त्यानंतर दि. 05/09/2022 रोजी पोलीस बंदोबस्तात सदर संपादित जागेची मोजणी करण्यात आली व दि. 18/11/2022 रोजी मोजणीच्या कायम खुणा करण्यात आल्या.

सदरचा रस्ता हा गट क्र 27 मधील संपादित क्षेत्रामधून देखील जातो त्यावरुन दौलत श्रीपत ठोंबरे यांना या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याबाबत उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांच्या कार्यालयाने त्यांना कल्पना दिली होती व त्यांना सदर जागेवरील पीक व पाईप काढून घेणेबाबत लेखी नोटीस देण्यात आलेली होती. यापूर्वी देखील दि. 26/04/2023 रोजी या कार्यालयाचे शाखा अभियंता पी. ई कडवे हे काम करून घेण्यासाठी गेले असता त्यावेळेसही त्यांना काम करू दिले नव्हते.

दि. 26/04/2023 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ सोबत शाखा अभियंता कडवे सदर संपादित जागेवर काम करून घेण्यासाठी गेले असता तेथे 1) दौलत श्रीपत ठोंबरे 2) दिनकर दौलत ठोंबरे 3) कैलास दौलत ठोंबरे 4) अन्य एक महिला हे आले व उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांना म्हणाले की, तुम्ही इथे कशाला आले त्यावरुन त्यांना समजावून सांगितले की, सदर जागेवर रस्त्याचे काम चालु करायचे आहे सदरची जमीन ही शासकिय संपादित जमीन आहे. असे समजावुन सांगत असता ते सर्वजण उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांच्या अंगावर धावून आले व दमदाटी केली.

त्यावेळी उपविभागीय अधिकारी शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ यांच्या सोबत असलेले शाखा अभियंता कडवे तसेच पोलीस स्टेशन देवगाव रंगारी येथील पोलीस यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव केली. त्यावेळी 1) दौलत श्रीपत ठोंबरे 2) दिनकर दौलत ठोंबरे 3) कैलास दौलत ठोंबरे 4) अन्य एक महिला यांनी सर्वानी शिवीगाळ केली व दौलत श्रीपत ठोंबरे याने तुम्ही इथे काम करण्यास सुरवात केली तर मी आताच विष पिवून आत्महत्या करतो अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

शेख मोहम्मद अशपाक मोहम्मद हनिफ (वय 54 वर्षे व्यवसाय नौकरी उपविभागीय अधिकारी, शिवना टाकळी, कालवा उपविभाग टाकळी ता कन्नड जि औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कन्नड तालुक्यातील देवगाव पोलिस स्टेशनमध्ये 1) दौलत श्रीपत ठोंबरे 2) दिनकर दौलत ठोंबरे 3) कैलास दौलत ठोंबरे (4) अन्य एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!