जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

मुंबई, दि.२८ -: राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली. नुकतेच केदार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेटू घेऊन महाराष्ट्रातील क्रीडा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा बाबत चर्चा केली होती.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

यासंदर्भात केदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यानुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर मान्य करण्यात येणार आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १००० खेलो इंडिया सेंटर उघडण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या योजनेत महाराष्ट्रामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने, राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा खेलो इंडिया सेंटर उभारणीचा उद्देश आहे, असे केदार यांनी सांगितले.

त्याद्वारे लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, मला खात्री आहे की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. राज्यात जास्तीत खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर्स सुरु करून खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here