ADS 2

औरंगाबाद, दि. 23 – खुलताबाद पोलीस स्टेशन अंतर्गत वेरूळ येथे असलेल्या जय श्री राम सर्वो इंडियन ऑईल पेट्रोल पंप मँनेजरवर प्राणघातक हल्ला करून 5 लाख लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रोख रक्कम ३११६७० / -रुपयासह ०२ मोटारसायकली व ०३ मोबाईल असा एकूण ३,८६,६७० / – रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पेट्रोल पंपावरून कामावरून काढून टाकलेल्या युवकाने या लुटीचा डाव रचला होत्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक १९/०७/२०२१ रोजी विजय आसाराम बोडखे (पेट्रोल पंप मालक, रा. वेरुळ, ता.खुलताबाद) यांनी पोलीस स्टेशन खुलताबाद येथे फिर्याद दिली की, दिनांक १९/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.४० वाजेच्या सुमारास आमचे जय श्री राम सर्वो इंडियन ऑईल पेट्रोल पंप वेरुळ येथील मँनेजर अशोक गोपिनाथ काकडे हे पेट्रोल पंपावरील दोन दिवसाच्या पेट्रोल/डिझेल विक्रीतून आलेले पैसे एकूण ०५,३७,००० /- रुपये स्टेट बँक आँफ ईंडीया शाखा वेरुळ येथे भरण्यासाठी मोटारसायकलने वेरुळ गावाकडे जात होते. दरम्यान, त्यांच्या मोटारसायकला वेरुळ उड्डाण पुलालगत पाठीमागून धक्का देवून त्यांना खाली पाडले. त्यांच्या जवळील ०५,३७,०००/- रुपये पैशाची बँग हिसकावून मोटारसायकलने चोरटे पळुन गेले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन खुलताबाद येथे गुरन २६२/२०२१ कलम ३९४ भादवी प्रमाणे दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खुलताबाद हे करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पेट्रोल पंपावर पूर्वी काम करणारा व त्यास कामावरून कमी केलेला प्रकाश कल्याण चुंगडे (रा.खापरखेडा ता.कन्नड) याच्यावर संशय गेला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावरून पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी प्रकाश कल्याण चुंगडे याचे बाबत माहीती घेऊन तांत्रीक विश्लेषण केले. सदरचा गुन्हा प्रकाश कल्याण चुंगडे याने त्याच्या साथीदारसह केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी १) प्रकाश कल्याण चुंगडे (२१, रा.खापरखेडा ता.कन्नड), २) महेंद्र रामदास साळुंके (२१, रा.मनुर ता.वैजापूर), ३) नितीन घाशीराम राजपुत (२१, रा.खापरखेडा ता.कन्नड), ४) अर्जुन मिठु ताटु (रा.रुपवाडी पोस्ट सासेगांव ता.कन्नड) यांना दिनांक २१/०७/२०२१ रोजी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी त्याचा फरार असलेल्या साथीदाराचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपीतांकडून रोख रक्कम रुपये ३,११,६७० रुपये तसेच गुन्ह्यात वापरेलेल्या दोन मोटारसायकली किमती ६०,०००/ -रुपये व आरोपीचे ०३ मोबाईल किमती १५०००/- रुपये असा एकूण ३,८६,६७० रुपयेचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. चार आरोपी अटक करण्यात आलेले असून दिनांक २४/०७/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मध्ये आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक खुलताबाद , पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे , पोलीस नाईक यतीन कुलकर्णी , भगवान चरावंडे , कारभारी गवळी, सुहास डबीर, पोलीस शिपाई कृष्णा शिंदे, मपोशी रुपाली सोनवणे चालक हेड कॉन्स्टेबल रामदास दिवेकर, प्रमोद गरड यांनी केली. पोलीस अधीक्षकांनी या कामगिरीबाबत तपास अधिकारी व तपास पथकातील अंमलदार यांचे अभिनंदन करुन १०,००० / – रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा