ADS 2

औरंगाबाद, दि. 19 – सिडको आणि हर्सूल परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपीकडून घरफोडीचे 03 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. नईम ऊर्फ चुन्नु उस्मान शहा (37, रा. सईदा कॉलनी जटवाडा रोड औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी चोरी करताना महिलांचे कपडे परिधान करून चोरी करण्यामध्ये पारंगत असून त्याच्याकडून एन 1 परिसरातील व मयुर पार्क परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हेशाखेला गोपनीय माहिती मिळाली की,उच्चभ्रु वस्ती मयुर पार्क, एन 1 परिसरात घरफोडी करणारा अट्टल घरफोड्या नईम ऊर्फ चुन्नु उस्मान शहा (37, रा. सईदा कॉलनी जटवाडा रोड औरंगाबाद) हा त्याचे राहते घरी सईदा कॉलनी जटवाडा रोड येथे आलेला आहे. मिळालेल्या या गोपणीय माहीतीवरुन गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

तंत्रशुध्द पध्दतीने माहीती घेतली असता त्याने एन 1 परिसरात 20 ते 22 दिवसांपूर्वी गरवारे स्टेडीयमजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन एम सिडको येथील अभिलेख तपासले असता चुन्नुने फिर्यादी खलील एहमद गुलाम (55, वर्ष व्यवसाय वकील, रा. एन 1 गरवारे स्टेडीयम जवळ औरंगाबाद) यांच्या घरात दिनांक 29/08/2021 रोजी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. चुन्नुने सदर ठिकाणी गुन्हा केल्याचे कबुल केले केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या गुन्हयातील चोरून नेल्याले सोन्याचे दागिने चुन्नुकडून हस्तगत करण्यात आलेले आहे. त्यानंतर चुन्नुला विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता 09 ते 10 महीण्यापूर्वी एन 1 परिसरात राहणारे फिर्यादी रविंद्र कुमार रामसुंदरसेठी (54, एन 1 सिडको) यांच्या घरात देखील रात्री घरफोडी केल्याचे कबुल केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस ठाणे एम सिडको येथे गुन्हा दाखल आहे.

तसेच 10 ते 12 दिवसांपूर्वी म्हसोबा नगर हर्सल येथे फिर्यादी कडुबाई बालाजी चाथे (45) यांच्या घरी देखील रात्री घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याअनुषंगाने पोलीस ठाणे हर्सल येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी चोरी करताना महिलांचे कपडे परिधान करून चोरी करण्यामध्ये पारंगत असून त्याच्याकडून एन 1 परिसरातील व मयुर पार्क परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाणे सिटीचौक, सिडको, एम सिडको, बेगमपुरा, मुकुंदवाडी येथे चोरी, घरफोडी, खून, मारहाण असे गुन्हे दाखल आहे. आरोपीकडून घरफोडीचे 03 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा रविद्रं साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश अघाव, पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपुत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, अश्विन होनराव, महीला पोलीस अंमलदार कुंटे, पुनम पारधी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

ADS 4