ADS 2

बीड, दि. 18 – बीड जिल्ह्यातील मृत्युदर देखील चिंताजनक असून हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बहात्तर तासांच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी तपासणी वाढवल्या पाहिजेत. तसेच तपासण्या करताना शास्त्रीय दृष्ट्या अधिकृत ठरविण्यात आलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची पद्धत वापरली पाहिजे. यामुळे रुग्णांचे सहवासित, हाय-रिस्क, लो-रीस्क बाधित सापडण्यास मदत होईल आणि जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट बरोबरच मृत्यु दर नियंत्रणात आणण्यास उपयोग होईल यावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील covid-19 विषाणू प्रादुर्भाव आढावा आणि जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राजेश टोपे म्हणाले की, आजार अंगावर न काढता तपासणी व रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी जिल्हा परिषद सर्कल स्तरावर नियोजन करून व्यापक जनजागृती करावी. ते पुढे म्हणाले की, कोरोना रुग्णांचे बील अदायगीच्या व नियंत्रणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक खाजगी कोविड रुग्णालयात शासनाच्या वतीने ऑडिटरची नेमणूक केली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल यादृष्टीने हायकोर्टात देखील शासनाने सादर केले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

काळी बुरशी च्या आजारासाठी राज्य शासनाने औषधे आणि इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून उपलब्ध केली आहेत. त्यामुळे कोणत्याही रुग्णास जास्त रक्कम देऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही. तसेच यासाठी तातडीची साडेसहा हजार कोटी रुपये तरतूद केली असून आवश्यक औषधे केंद्र सरकार करून खरेदी करण्याची राज्याची तयारी आहे, असेही आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे म्हणाले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी प्रशासनाने कोरोना तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या पूर्वतयारीबाबत सांगितले. बालकांना उपचाराच्या दृष्टीने बालरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांचे सेवा तालुकास्तरावर देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिटसाठी आणि आणि लसीकरण वेगात व्हावे देखील कार्यवाही केली जात असल्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर आढावा सादर केला. बीड जिल्ह्यात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे एकूण २ लाख 18 हजार 558 तपासणी केली जात आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.43 टक्के असून बीड जिल्ह्याचा 15.29 टक्के आहे. तर मृत्यूदर राज्याचा 19.40 टक्के व बीड जिल्ह्याचा 26.50 टक्के आहे. जिल्ह्यातील लसीकरण शासनाच्या सूचनांनुसार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यासह सर्वांसाठी सुरू आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यास लसी उपलब्ध होतील असे नियोजन केले असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी कोरोना काळात भरती करण्यात आलेल्या तात्पुरत्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतचा आणि ऑक्सिजन उपलब्धते बाबत प्रश्न मांडला. आमदार सोळंके यांनी मृत्यु दर वाढण्याची कारणे तपासली जावीत आणि त्यावर उपाय योजना केल्या जाव्यात असे मत व्यक्त केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेड असलेल्या रुग्ण याची व्यवस्था होणे गरजेचे आहे याची मागणी मांडली, आ. धस यांनी जिल्ह्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त करताना लसींचा साठा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मांडली. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, आ. संजय दौंड, आ. वसंत काळे यांनी देखील आपले मनोगत मांडले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

काळी बुरशी (म्युकरमायक्रोसिस) या आजारावरील उपचारांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 88 लक्ष रुपये तरतूद केली असून यातून काळी बुरशी वरील शस्त्रक्रियासाठी लागणारे मायक्रो -डी-ब्राईडर यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे, असे अधिष्ठाता डॉ सुक्रे यांनी सांगितले. उपचारावरील सायनस एंडोस्कोपी मध्ये या यंत्रणेची विशेष गरज असून याची खरेदी परदेशातील उत्पादकता द्वारे करून ते आयात करण्यासाठी परवानगी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयीन अधिकार्‍यांना दूरध्वनी वरून थेट सूचना केल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा