जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. 27 – औरंगाबाद ग्रामीण, आयुक्तालय, जालना, बुलढाणा, नाशिक, जळगांव जिल्ह्यांत मोटारसायकल चोरीचे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला. त्यांचेकडून चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त करण्यांत आल्या आहेत. रामेश्वर मच्छिंद्र ताजी (३१, रा. लिहा (पारध) ता. भोकरदन, जि. जालना ह.मु. बकवाल नगर, गल्ली नं.०४ वाळूज औरंगाबाद) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज, २७/०५/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना जिल्हयांत मोटारसायकल चोरून त्या खेडया पाडयातील लोकांना बँकेने ओढलेल्या मोटारसायकली असून त्यांची कागदपत्रे नंतर आणून देतो व इतर खोटे कारण सांगून त्यांना विक्री करणाऱ्या टोळीतील पोलीस ठाणे करमाड गु.र.नं ८८/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि व इतर गुन्हयांतील फरार आरोपी रामेश्वर मच्छिंद्र ताजी हा वाळूज परिसरात आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

वाळूजमधून उचलले- आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाळूज भागात रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपीचा वाळूज परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतलं. त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव रामेश्वर मच्छिंद्र ताजी (३१, रा. लिहा (पारध) ता. भोकरदन, जि. जालना ह.मु. बकवाल नगर, गल्ली नं.०४ वाळूज औरंगाबाद) असे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसह मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

तीन मोटारसायकली जप्त- आरोपीच्या ताब्यात (१) एक ६०,००० / – रुपये किंमतीची काळ्या रंगाची एफ.झेड यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम.एच – ०२ – सि.जी. – ८८२० जिचा चेसीस नंबर खोडलेला असून इंजिन नं. 21c8003542 असा असलेला (२) एक ५०,००० / – रुपये किंमतीची सि.बी.शाईन होंडा मोटारसायकल क्रमांक एम.एच – २० – ई.डब्ल्यु -३७६८ जिचा चेसीस नं . ME4JC651HFT080681 व इंजिन नं. JC65ET0116064 असा असलेली (३) एक ३५,००० / रुपये किंमतीची एच.एफ डिलक्स मोटारसायकल विना क्रमांकाची जिचा चेसीस नं. MBLHA11AZG9H05557 इंजिन नं. HA11EKG 9H05461 असा असलेली व एक मोबाईल हँडसेट असा एकूण १,४५,५०० / – रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यांत आल्या. आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे करमाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी बजावली कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उप निरिक्षक संदीप सोळंके, पोहेकॉ श्रीमंत भालेराव, धिरज जाधव, बालू पाथ्रीकर, पोना राहूल पगारे, पोकॉ संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके करीत आहे.

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here