जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

मुंबई दि. ३१ – सात वर्षांत महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात १५ लाख आले नाहीत… दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही… जी – जी स्वप्न मोदींनी दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या सात वर्षाच्या कार्यकाळावर केली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

केंद्र सरकारने सात वर्षे तर मोदींनी दोन टर्म पूर्ण केले आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले… काही लोक बेरोजगार झाले… कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले… अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.

सात वर्षांत देशात गरीब गरीबच राहिला… बेरोजगारी वाढली… महागाई जास्त झाली… लोकांच्या जीवनात कोणताच बदल भाजपच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here