छत्रपती संभाजीनगर
Trending

बिडकीन आणि छत्रपती संभाजीनगरचे दोन रिक्षाचालक अटकेत ! नशेसाठी वापर होणाऱ्या गुंगीकारक सिरपच्या बॉटल विक्री करताना जालान नगर परिसरात पकडले !!

NDPS सेलची कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – नशेसाठी वापर होणाऱ्या गुंगीकारक सिरपच्या बॉटल विक्री करताना जालान नगर परिसरात बिडकीन आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन रिक्षाचालकांना अटक करण्यात आली. NDPS सेलने ही कारवाई केली.

यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 28/04/2023 रोजी एन.डी.पी.एस. पथकास दोन जण जालान नगर येथील मनपा गार्डन समोर गुंगीकारक व नशेसाठी गैरवापर होवू शकणाऱ्या सिरपच्या बॉटल विनापरवाना व बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता रिक्षा (क्रमांक MH-20-EF-2218) मध्ये येणार असल्याची खात्रीलायक गोपनिय बातमी मिळाली.

या बातमीची खात्री करून NDPS सेलने जालान नगर येथील मनपा गार्डन समोर औषधी निरीक्षक जि.द. जाधव यांच्यासह सापळा रचून सय्यद सोहेल सय्यद मेहमुद (वय 29 वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. आईस्क्रिम फॅक्टरीजवळ, रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर) आणि शहजाद मंजुर शेख (वय 24 वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. भारत नगर, बिडकीन पोलीस स्टेशन समोर, बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर होणा-या गुंगीकारक सिरपच्या बॉटल जप्त करण्यात आल्या.

आरोपींकडून एकूण 92 नग Monocoff-plus cough syrup बॉटल व इतर मुद्देमाल असा एकूण 2,94,960/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाणे सातारा येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ ( NDPS Act) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाही पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय). अपर्णा गिते, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर वाघ, औषध निरीक्षक जि. द. जाधव, पोअ/ धर्मराज गायकवाड, मंगेश हरणे, राजाराम वाघ, सुनील पवार, नितीन देशमुख, , मपोअं प्राजक्ता वाघमारे, चालक दत्ता दुभळकर, सर्व नेमणुक NDPS सेल, गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!